Breaking News

कालचा अतुल्य भारत आज कुठे आहे?.

Advertisements
Advertisements
भारत हा कृषिप्रधान देश होता त्यांची शेतजमीन सुजलाम सुपलम होती,मेरे देश की धरती सोना उगले, उगले हिरे मोती मेरे देश कि धरती असे लोकप्रिय गीत प्रत्येक शाळेत शिकविल्या जात होते. त्यामुळेच शेतकाऱ्यांच्या मुलामुलींना गर्व वाटत होता.अनेक मुल शिक्षण घेऊन सुद्धा वडिलोपार्जित शेती संबाळत होते. त्यावेळी त्या शाळा कॉलेज मध्ये कृषिप्रधान भारताला अतुल्य भारत म्हटल्या जात होते. आजचा कॉलेज मधील विद्यार्थी वडिलांना शेती विकून नोकरीसाठी पैसे भरायला सांगतो.आजचा तरुण खेड्यात राहण्यापेक्षा शहरात राहण्यासाठी सोन्यासारखी शेत विकण्यास शेतकरी बापाला मजबूर करतो.आणि तुमच्या वेळचा अतुल्य भारत आज कुठे आहे?.असे विचारतो.
निसर्गाच्या सानिध्यात वावरणाऱ्या शेतकऱ्यांचे व मुक्या जनावरांचे खूप मैत्रीपूर्ण नातं असते. शेतात नांगर वखर, तिफण,डावरे चालवत असतांना बैलांना शौचास व लगवी आली तर शेतकरी त्यांना काही वेळ उभे राहू देतो त्यांच्या नैसर्गिक किर्या पूर्ण होऊ देतो.हे त्या मुक्या प्राणी बैल व शेतकऱ्यांचे सामाजिक बांधिलकी असलेलं नातं असते. बैलाला शेतकऱ्यांबद्दल शेतकऱ्याला बैला बद्दल असलेलं नैसर्गिकरित्या प्रेम असते. ते एकमेकांना पूर्णपणे समजून घेतात.ही वडिलोपार्जित महान परंपरा आज काल संपत चालली आहे. पूर्वी शेतकऱ्याकडे किती बैल जोड्या आहेत यावरून त्यांची ओळख निर्माण होत असे.शेती किती एकर आहे नंतर विचारले जात होते. तेव्हा शेतकरी आजच्या सारखे उच्च शिक्षित नव्हते तरी त्यांना शेती व बैला बद्दल प्रचंड प्रेम, जिव्हाळा आपुलकी होती म्हणूनच देश सुजलाम सुपलम होता त्यालाच अतुल्य भारत म्हटल्या जात होते. म्हणूनच आजच्या स्मार्टफोन इंटरनेट वापरणाऱ्यांना कालचा अतुल्य भारत आज कुठे आहे माहीत नाही.
शेतकऱ्याच्या घरी फक्त बैल नसत तर गायी, म्हशीं असतं आणि त्यांच्या दुधापासून तयार करण्यात आलेलं शुद्ध तूप आज दोन हजार रुपये किलोने विकल्या गेले असते.पण तो शेतकरी दर दोन दिवसांनी अर्धा अर्धा किलो शुद्ध तूप आपल्या बैलांना पाजत असे त्यामुळेच बैल शेतीचे काम करण्यासाठी धष्ट पुष्ट असत.दोन दिवसा नंतर ठरलेल्या वेळी बैलाला त्यांचे खाद्य दिले नाही तर तो सारखा आपल्या मालकाकडे म्हणजे शेतकऱ्याला पाहून हंबरडा फोडतो गळ्यातील घंटी जोर जोरात वाजवतो.शेतकऱ्यांना ते सर्व माहीत असते, तो हातातील काम पूर्ण करून देऊ असा विचार करत असतो.पण वेळेचे बंधन दोघांना चांगल्या प्रकारे माहिती असते. म्हणूनच ते शेतकरी सधन,सुखा समाधानाने जगणारे होते.निसर्गाशी व सर्व प्राणी मात्रावर त्यांचे नित्तांत प्रेम होते.आता मुलमुली इंग्रजी मेडियम मध्ये शिक्षण घेतात पण शेतीत काय पिकते ते त्यांना माहित नाही.शेण म्हणजे काय ते कुठे मिळते ते कसे असते याचे कुतूहल शहरातील मुलामुलींना असते.
शेती शेतकरी आणि पक्षी यांचे नैसर्गिकरित्या नातं ही खूप अतूट असते.काही पक्षी शेतीत अंडे देतात त्यांना ऊब देतात अशा वेळी शेतकरी बैल घेऊन तिकडे जात असेल तर तो पक्षी जोरजोरात आवाज देतो.त्या आवाजाने बैल व शेतकरी दोघेही समजतात की या पक्षांचे अंडे किंवा पिल्लं तिकडे आहेत.त्यावेळी तिकडे जाणे दोघेही टाळतात हे शिक्षण त्यांना कोणी दिले नसते.निसर्गावर प्रेम करणाऱ्यांना निसर्गाच्या सानिधात राहणाऱ्या प्रत्येक जीवाची माहिती आपोआप लहानपणा पासून मिळत जाते.आजच्या सारखे आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण त्यांना नव्हते तरी ते मेरे देश की धरती सोना उगले!. उगले हिरा मोती म्हणत होती.म्हणूनच आज विचारले जाते,कालचा अतुल्य भारत आज कुठे आहे?.
शेतकरी हा नेहमीच धार्मिक विधी करणारा निसर्ग नियमांचे पालन करणारा माणूस होता. दुपारी किंवा संध्याकाळी स्वतः जेवण करण्या आदी बैलांना गाई,म्हशींना पाणी पाजून चारा टाकून जेवायला बसत असे. या नियमांचे तो काटेकोरपणे पालन करीत असे.शेतकऱ्यांचे व बैलांचे नातं नैसर्गिक जिव्हाळ्याचे असते, म्हणूनच बैल म्हातारा झाला तर तो कधीच कासायाला विकत नाही, तो त्याची मरे पर्यंत चारा पाणी खाऊ घालून सेवा करतो. त्याकाळी अशिक्षित शेतकरी हा बैलांच्या माताचा म्हणजे गोमाताचा दूध पिला असतो.त्याच्या कष्टाची कमाई खाल्ली असते.म्हणून तो म्हातारपणी बैलाला कासायाकडे देत नाही.उलट तो मरण पावला तर हाच शेतकरी हुंदके हंबरडा देऊन रडतो.काही अपवादात्मक असतात.दररोज दुपारी संध्याकाळी त्याला जेवतांना त्या मित्रांची बैलाची आठवण येत राहते.वडील शेतकऱ्यांची ही दशा पाहून मुलांना पण वडील व बैलाच्या नैसर्गिक नात्यांची कल्पना येते आणि ते ही भावनिक होऊन जातात.
पूर्ण जीवनभर बैल आपल्या मालक शेतकऱ्यांची मूक भाषा समजत होता, तर मालक शेतकरी सुद्धा आपल्या बैलाची मूक भाषा हावभाव समजून घेत होता.तो सुजलाम सुपलम भारत आपल्या व्यवहाराने उच्चशिक्षित व धन,धान्याने धनवान होता. तथागत बुद्धाच्या विचाराने शेतकरी, शेतमजूर आणि सावकार बहुजन हिताय बहुजन सुखाय नारा देऊन जीवन व्यवहार करीत होता. तेव्हा बँका नव्हत्या, एकमेकांवर विश्वास ठेवून सोने,चांदी पैसे ठेवल्या जात होता. मोठा भाऊ लहाण्या भावाची शेतजमीन कधीच हडप करीत नव्हता.भाऊ भाऊ त्यांच्या बायको मुलामुलींना घेऊन आईवडीला सोबत एकत्र कुटुंबात आनंदाने राहत होती.ती वैचारिक मानसिकता एकत्र कुटुंबात होती म्हणूनच अडीच हजार वर्षे त्या विचाराने यशस्वी राज्य केले.तो वैभवशाली प्रबुद्ध भारत होता.खरोखरच अतुल्य भारत होता. तो व्यवहार आता राहिला नाही, म्हणूनच शेतकरी आत्महत्या करतो,शेतमजूर नाही.आजच्या माणसाने निसर्गाचे सर्व नियम धाब्यावर बसवून सुखा समाधानाने जगण्याचे स्वप्न पाहतो.तो भौतिक सुख भोगतो पण ते जास्त वेळ टिकत नाही.
आज कोणत्याही माणसात नीतिमत्ता राहिली नाही. कुटुंबातील माणसांचा बळी देण्यास मागेपुढे न पाहणारा व्यक्ती कोणत्या थरावर जाईल यांची शास्वती राहिली नाही. पूर्वी लोक काय म्हणतील?. नातलगांना काय वाटेल आणि गांव काय करेल ही भीती प्रत्येक कुटुंबातील माणसांना होती म्हणूनच तो वैभवशाली भारत देश होता,त्यालाच जगात अतुल्य भारत म्हणून गौरविण्यात येत होते.आता तर राम नाम सत्य है म्हणणाऱ्यांचे दिवस आहे.लोक काय म्हणतात ऐकू नका,कुटुंबातील वडीलधारी काय सांगतात त्याकडे दुर्लक्ष करा,मानवी प्रेमाचा जिव्हाळा संपला तिथे निसर्गाच्या प्रेमाचा झाडे जंगल कापून प्राणी पक्षातील वैचारिक मानसिकता नष्ट होत आहे.त्यातून निर्माण होणारी एकाधिकारशाही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कुटुंबात,समाजात आणि देशात कोणालाच कोणाची भीती राहिली नाही.त्यामुळेच गौरवशाली भारताचा इतिहास नष्ट होतांना दिसत आहे, आम्ही आम्हालाच विचारतो कालचा अतुल्य भारत कुठे आहे.भारताला गौरवशाली वैभव प्राप्त करण्यासाठी शेती शेतकरी आणि निसर्गाशी पहिल्या सारखे घट्ट नात निर्माण करावे लागेल.तरच एकूण सर्व मानव प्राणी पक्षी आनंदाने जगतील.धर्म कोणताही असो,राज्य कोणतेही असो शेती आणि निसर्गाशी आपल्याला एकरूप व्हावे लागेल.अन्यता श्वास घेण्यासाठी लागणारा ऑक्सिजन कुठेही मुबलक प्रमाणत विकत मिळणार नाहीच त्यासाठी लागणारा पैसा कुठून येईल.हा ही मोठा प्रश्न आहेच.म्हणूनच प्रत्येक माणसांचे कर्त्यव आहे कि त्यांनी कालचा अतुल्य भारत आज कुठे आहे.हे शोधले पाहिजे.पावसाला सुरु झाला जिथे शक्य आहे तिथे झाडे लावा.तीच झाडे तुम्हाला भरपूर फायदा देतील.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९.भांडूप,मुंबई
Advertisements

Check Also

दुपारी १ वाजता निकाल लागूनही विद्यार्थी आणि पालकांना आपला निकाल पाहता आलेला नाही.

बोर्डाचा गलथान कारभार; चार तासानंतरही विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईना दहावीच्या निकालाच्या दोन्ही वेबसाईट तब्बल ३ तासांहून …

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन ▪️   चंद्रपूर ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजिकल सोसायटीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *