Breaking News

गडचांदूर तलाठी कार्यालय इमारतीचे बांधकाम संथगतीने. 

Advertisements
Advertisements
गडचांदूर तलाठी कार्यालय इमारतीचे बांधकाम संथगतीने. 
(ठेकेदाराची दिरंगाई,संबंधित विभागाचे दुर्लक्ष नागरिकांना त्रासदायक.) 
कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
   कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहर येथील तलाठी कार्यालयाच्या जून्या इमारतीच्या जागी नवीन इमारत बांधली जात आहे.चंद्रपूर येथील एका ठेकेदाराला हे काम देण्यात आल्याची माहिती असून हे काम गेल्यावर्षी फेब्रुवारी २०२० पासून सूरू आहे.वास्तविक पाहता एकावर्षात सदर इमरतीचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते.मात्र १६,१७ महिन्यांचा कालावधी लोटूनही अर्धवट काम झाल्याचे चित्र पहायला मिळत असून तलाठी कार्यालय सध्या जवळील एका किरायाच्या खोलीत सुरू आहे.अत्यंत संथगतीने होत असलेल्या सदर बांधकामाला ठेकेदाराची दिरंगाई,सा.बां. विभागाच्या संबंधित अधिकार्‍याचे दुर्लक्ष कारणीभुत ठरत असल्याचे आरोप नागरिकांकडून होत आहे.मार्च २०२१ ला स्लॅब टाकण्यात आल्यानंतर काम पुर्णपणे बंद असल्याची माहिती आहे.मात्र १७ जून रोजी सदर प्रतिनिधींनी याठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली असता दोन,तीन लेबर स्लैबवर काही काम करताना दिसले.अशा पद्धतीने जर काम सुरू राहिले तर इमारत पूर्णत्वास येण्यासाठी अजून किती वर्ष लागेल हे सांगणे कठीण झाले आहे.
     गडचांदूर हे औद्योगिक व तालुक्यातील सर्वात मोठे शहर आहे.येथील तलाठी साजा अंतर्गत ५ गाव समाविष्ट असून मंडल अधिकारी कार्यालय सुद्धा याच इमारतीत आहे. स्थानिकांसह तलाठी साजा अंतरगाव येणाऱ्या गावातील नागरिक सातबारा,जमिनीचे फेरफार, उत्पन्न दाखले व इतर कामांसाठी या कार्यालयात येतात.स्थलांतरीत कार्यालयात जागा कमी असल्याने लोकांसह येथील तलाठी व कर्मचाऱ्यांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.अशी परिस्थिती निर्माण झाली असून याविषयी सदर प्रतिनिधींनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला असता ते सुद्धा ठेकेदाराच्या कामगिरीवर थोडे नाराज असल्याचे जाणवले.लवकर काम करा असे सांगण्यात येत मात्र कोरोनामुळे लेबर मिळत नसल्याचे कारण ठेकेदार देत असल्याची माहिती देण्यात यांनी दिली आहे. यानंतर ठेकेदाराची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी प्रतिनिधींनी सलग दोन दिवस भ्रमणध्वनीवरून संपर्क केला मात्र फोन बंद दाखवत होते.कामाची गती पाहता या जन्मी नवीन तलाठी कार्यालयाचे सुख मिळेल का ? सा.बा.विभागाचे ठेकदारावर वचक नाही का ? असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहे.वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असून लवकरात लवकर काम पुर्ण करून नवीन इमारतीत तलाठी कार्यालय सुरू करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
Advertisements

Check Also

दुपारी १ वाजता निकाल लागूनही विद्यार्थी आणि पालकांना आपला निकाल पाहता आलेला नाही.

बोर्डाचा गलथान कारभार; चार तासानंतरही विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईना दहावीच्या निकालाच्या दोन्ही वेबसाईट तब्बल ३ तासांहून …

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन ▪️   चंद्रपूर ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजिकल सोसायटीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *