Breaking News

भारतीय जैवविविधता अवार्ड -२०२३ करिता प्रस्ताव सादर करा , चंद्रपूर शहर महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन

Advertisements
Advertisements
भारतीय जैवविविधता अवार्ड -२०२३ करिता प्रस्ताव सादर करा
चंद्रपूर शहर महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन

चंद्रपूर, ता. १८ : राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण व पर्यावरण, वन व वातावरण बदल, कार्यालय भारत सरकार, न्यु दिल्ली यांनी UNDP च्या मदतीने जैवविविधता संवर्धन व संरक्षण, जैविक संसाधनाचा शाश्वत वापर व जैविक संसाधनाचा व्यावसायिक वापर होत असल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेला मिळणारा योग्य व समन्यायी लाभांश मध्ये उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्ती / स्वयंसेवी संस्था / शैक्षणिक संस्थेला भारतीय जैवविविधता अवार्ड ( Indian Biodiversity Award ) सन २०१२ पासून प्रदान करण्यात येत आहे. यंदाच्या भारतीय जैवविविधता अवार्ड (Indian Biodiversity Award ) -२०२३ करिता प्रस्ताव सादर करा, असे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण यांनी Indian Biodiversity Award २०२३ करिता संबंधित व्यक्ती / संस्थेकडून उत्कृष्ठपणे कार्य केलेल्या व्यक्तीच्या प्रवेशिका मागवलेल्या आहे. प्रत्येक वर्गवारीमध्ये ५ लाख रुपयाचे बक्षीस असून प्रोत्साहनपरसुध्दा दोन प्रवेशिकांना सन्मानित करण्यात येणार आहे. इच्छुिक व्यक्ती / संस्था यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन विशिष्ट प्रपत्रात त्यांचे प्रस्ताव ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण, चेन्नई कार्यालयात परस्पर पाठवावे किंवा ३१ ऑक्टोबर २०२१ पूर्वी या कार्यालयात पाठवावे, जेणेकरुन त्यांचे प्रस्ताव या कार्यालयाकडून शिफारशीसह राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण, चेन्नई यांच्याकडे मुदतीपूर्वी पाठवता येईल, अधिक माहितीसाठी इच्छुक व्यक्ती यांनी राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण यांच्या संकेतस्थळास भेट द्यावी किंवा अधिकच्या माहितीकरिता या कार्यालयातील ईमेल msbb.ngp@gmail.com द्वारे संपर्क करावा, अशी माहिती महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा सदस्य सचिव प्रवीण श्रीवास्तव यांनी दिली आहे.

प्रवेशिकेची वर्गवारी खालीलप्रमाणे आहे.
१. Conservation & Sustainable use of biological resource

 (जैविक संसाधनाचे शाश्वत वापर व संवर्धन )
२. Best Biodiversity Management Committees .

 (जैवविविधता संवर्धनाची उत्कृष्ट कार्य केलेले जैवविविधता व्यवस्थापन समिती)
३. Incentivizing Access & Benefit Sharing 

(योग्य व समन्यायी लाभांश प्रक्रिया यशस्वीपणे राबविलेली संस्था / व्यक्ती)
४. Best People’s Biodiversity Register 

(उत्कृष्ट लोक जैवविविधता नोंदवही)
Advertisements

Check Also

दुपारी १ वाजता निकाल लागूनही विद्यार्थी आणि पालकांना आपला निकाल पाहता आलेला नाही.

बोर्डाचा गलथान कारभार; चार तासानंतरही विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईना दहावीच्या निकालाच्या दोन्ही वेबसाईट तब्बल ३ तासांहून …

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन ▪️   चंद्रपूर ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजिकल सोसायटीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *