Advertisements
Advertisements
काँग्रेस खासदार “राहुल गांधी” यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.
(कोरपना येथे रुग्णांना फळ वाटप.)
कोरपना(ता.प्र.):-
अखील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष,युवकांचे प्रेरनास्थान,खासदार “राहुल गांधी” यांचा वाढदिवस कोरपना येथे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.माजी जि.प.सदस्य उत्तमराव पेचे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आले.यावेळी शामबाबू रणदिवे,विजय बावणे,भारत चन्ने,सुरेश पाटील मालेकर,रसुल पटेल,सुनील बावणे,अनील गोंडे, ईस्माईल भाई,रहेमान भाई,रामाभाऊ पंधरे, निसार शेख,देविदास डोंगे,लखन पंधरे,शुभम गोचे,मुस्तफा़ भाई सह इतरांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.खासदार राहुल गांधी यांच्या बाबत व देशासाठी बलिदान देणारे माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी,स्व.राजीव गांधी बाबत उपस्थित मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले.या निमीत्ताने कोरपना येथील ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन प्रशांत लोडे,प्रास्ताविक शहराध्यक्ष सुनील बावणे व आभार युवक काँग्रेस शहराध्यक्ष शेख इस्माईल भाई यांनी व्यक्त केले.
Advertisements