Breaking News

जिल्ह्यात 24 तासात 43 कोरोनामुक्त, 54 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यु

Advertisements
Advertisements

जिल्ह्यात 24 तासात 43 कोरोनामुक्त54 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यु

चंद्रपूर,दि. 19 जून :  गत 24 तासात जिल्ह्यात 43 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 54 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत.  तसेच  1 बाधिताचा जिल्हयात मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार बाधित आलेल्या 54 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 17, चंद्रपूर तालुका 5, बल्लारपूर 11, भद्रावती  1, ब्रम्हपुरी 0 , नागभिड 0, सिंदेवाही 1, मूल 1, सावली 2, पोंभूर्णा 1, गोंडपिपरी 1, राजूरा 3, चिमूर 2, वरोरा 2, कोरपना 7, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत झालेल्यांमध्ये पोभुंर्णा  तालुक्यातील 1 महिलेचा समावेश आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 82 हजार 268 झाली आहे. सध्या 733 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5 लाख 33 हजार 957 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4 लाख 46 हजार 769 नमुने निगेटीव्ह आले आहेत.  जिल्ह्यात आतापर्यंत 1516 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Advertisements

Check Also

दुपारी १ वाजता निकाल लागूनही विद्यार्थी आणि पालकांना आपला निकाल पाहता आलेला नाही.

बोर्डाचा गलथान कारभार; चार तासानंतरही विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईना दहावीच्या निकालाच्या दोन्ही वेबसाईट तब्बल ३ तासांहून …

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन ▪️   चंद्रपूर ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजिकल सोसायटीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *