‘ हेल्पीग हॅन्ड ‘ संस्थेचा स्तुत्य उपक्रम, रूग्ण सेवेनंतर आता गरजू महिलेला ताडपत्रीची मदत

Advertisements
Advertisements
 ‘ हेल्पीग हॅन्ड ‘ संस्थेचा स्तुत्य उपक्रम 
* रूग्ण सेवेनंतर आता गरजू महिलेला ताडपत्रीची मदत
राजुरा, वार्ताहर  –
            राजुरा शहरातील हेल्पीग हॅन्ड या महिलांच्या सामाजिक संस्थेने कोरोना काळात शहरातील अनेक गरजू लोकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार मदत केली. याच अनुषंगाने पावसात घर गळून बेजार झालेल्या एका विधवा महिलेला घरावर टाकण्यासाठी ताडपत्री देऊन मदत केली. गरजू लोकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार नियोजनबद्ध मदत करणाऱ्या या सेवाभावी संस्थेच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
             सोमनाथपूर वॉर्डात श्रीमती पुष्पा इरकूलवार या महिलेचे झोपडीवजा घर आहे. पावसात तिचे घर पूर्णपणे गळू लागले. मात्र मजुरी करून आपले जीवनयापन करताना गळणाऱ्या घरातच आपल्या लहान मुलीसह ही विधवा महिला राहात होती. याची माहिती हेल्पीग हॅन्ड संस्थेच्या कृतीका सोनटक्के यांना मिळाली. त्यांनी तातडीने आपल्या समूहातील सदस्यांना माहिती दिली. संकटमोचन हनुमान मंदिर प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात श्रीमती  ईरकुलवार यांना ही ताडपत्री देण्यात आली.
          या कार्यक्रमात कृतीका सोनटक्के, स्नेहा चांडक, वज्रमाला बोलमवार, सुनिता जमदाडे, रजनी शर्मा, स्वरुपा झंवर, भावना रागीट, अमृता धोटे, संतोष झंवर, लता चांडक, रचना नावंदर, कंचन चांडक, रमा आयटलावार, सीमा कलसे इत्यादी सदस्या उपस्थित होत्या.‌
            हेल्पीग हॅन्ड संस्थेने कोरोना काळात अडचणीत असलेल्या अनेक बाधित रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना जेवणाचे डब्बे पुरवून मदत केली. आता शासनाकडून पाठ्य पुस्तकाचा लाभ न मिळणार्‍या गरीब विद्यार्थी – विद्यार्थिनींना पाठ्यपुस्तके व नोटबूक सह शालेय साहित्य वितरित करण्याचा मानस संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
Advertisements

Check Also

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*

*जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*   चंद्रपूर, दि. 19 मार्च : जिल्ह्यात …

  ‘‘ दि काश्मिर फाईल्स’’ प्रत्येक भारतीयांनी बघावा असा चित्रपट – हंसराज अहीर

  370, 35ए कलम हटविल्याने भविष्यात अशा राष्ट्रविरोधी कृत्याला थारा नाही.   ‘‘ दि काश्मिर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *