Breaking News

गडचांदूर येथील घरकूल धारकांचे चक्क पंतप्रधानांना पत्र.,पंतप्रधान आवास योजनेतील उर्वरीत रक्कमे बद्दल पत्रपरिषदेत मांडली हकिकत. 

Advertisements
Advertisements
गडचांदूर येथील घरकूल धारकांचे चक्क पंतप्रधानांना पत्र.
(पंतप्रधान आवास योजनेतील उर्वरीत रक्कमे बद्दल पत्रपरिषदेत मांडली हकिकत.) 
कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
       पडक्या झोपडीत किंवा किरायाच्या घरात राहणार्‍या अनेक गोरगरीब कुटुंबांना शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळत आहे.याच श्रेणीत वर्ष २०१८ मध्ये गडचांदूरातील ७७ कुटुंबांना घरकुल मंजूर करण्यात आले.बांधकामाच्या सुरूवातीला राज्य शासनाकडून टप्प्या,टप्प्याने दोन किस्त मिळाली.मात्र उर्वरित तीसरी किस्त केंद्र सरकारकडून आतापर्यंत मिळालेली नाही.ही रक्कम केंद्र सरकारने लवकरात लवकर द्यावी अशा मागणीचे पत्र येथील २३ घरकूल लाभार्थ्यांनी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पाठवले असून याविषयी पत्रपरिषद घेऊन या घरकुल लाभार्थ्यांनी आपली व्यथा मांडली आहे.
       सविस्तर असे की,गरजूंनी स्थानिक नगरपरिषदेकडे १९ सप्टेंबर २०१८ रोजी आवश्यक ती सर्व कागदपत्रे जमा केली.केंद्रीय मान्यता व सनियंत्रन समिती द्वारे एकूण ७७ लोकांना घरकूल मजूर झाले.यांतर लाभार्थ्यांनी जानेवारी २०१९ पासून घरांचे बांधकाम सुरू केले.जवळपास फेब्रुवारी २०२० ला पहिली व मार्च २०२१ ला दुसरी किस्त अशी एक लाखाची रक्कम राज्य शासनाकडून मिळाली. मात्र तिसरी किस्त दीड लाख रुपये केंद्र सरकारकडून अद्यापही मिळालेले नाही.यामुळे घराचे बांधकाम अर्धवट पडले असून पक्के घराचे स्वप्न पाहत असताना आता पुन्हा लहान लहान मुलांना घेऊन झोपडीतच राहण्याची पाळी आली आहे.पावसाळ्याचे दिवस असल्याने घरात पाणी शिरत आहे.विषारी जीवजंतूचा धोका वाढला असून काही लाभार्थी किरायाच्या घरात राहत आहे तर काहींना झोपड्या उभारून राहावे लागत आहे.पक्के घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उसनवारी करून कर्जा घेऊन घराचे बांधकाम केले.अशी बिकट परिस्थिती असून “नको रे बाबा नको,शासनाची योजना नकोच,आपली झोपडीच बरी” असे म्हणत आम्ही फसलो,तुम्ही तरी या भानगडीत पडू नका,असे आवाहन या त्रस्त घरकुल लाभार्थ्यांनी केले आहे.आता आम्हाला आत्महत्या शिवाय दुसरा मार्ग उरला नसून शासनाने याची वाट न पाहता त्वरित उर्वरित रक्कम द्यावी अन्यथा कुठलीही अप्रिय घटना घडलयास याची जबाबदारी शासनावर राहील असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
          शुद्धोधन खैरे,प्रशांत खाडे,वारलू रागीट, नागोबा ताजने,बब्लू रासेकर,गणेश कवलकर, विजय घायवनकर,इंदिरा शामसुंदर बोरकर, फुलाबाई मडावी,सिमा अशोक भगत,दिवाकर कष्टी असे एकूण २३ घरकूल धारकांनी पंतप्रधानांसह राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आयुक्त तथा नगर प्रशासन संचालनालय मुंबई, मुख्य अभियंता तथा राज्यस्तरीय समन्वय अधिकारी प्रधानमंत्री आवास योजना(म्हाडा) मुंबई,जिल्हाधिकारी चंद्रपूर,तहसीलदार कोरपना व मुख्याधिकारी न.प.गडचांदूर यांना मागणीचे निवेदन पाठवल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली असून आता याविषयी काय घडते ! याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Advertisements

Check Also

दुपारी १ वाजता निकाल लागूनही विद्यार्थी आणि पालकांना आपला निकाल पाहता आलेला नाही.

बोर्डाचा गलथान कारभार; चार तासानंतरही विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईना दहावीच्या निकालाच्या दोन्ही वेबसाईट तब्बल ३ तासांहून …

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन ▪️   चंद्रपूर ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजिकल सोसायटीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *