गुरुवारी बाधितांपेक्षा बरे होणारे पाच पटीने जास्त, 24 तासात 65 कोरोनामुक्त,13 पॉझिटिव्ह तर 2 मृत्यु

Advertisements
Advertisements

गुरुवारी बाधितांपेक्षा बरे होणारे पाच पटीने जास्त
* 24 तासात 65 कोरोनामुक्त,13 पॉझिटिव्ह तर 2 मृत्यु*
चंद्रपूर,दि. 24 जून : जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणा-यांची संख्या तब्बल पाच पटीने जास्त होती. गत 24 तासात जिल्ह्यात 65 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 13 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 2 बाधितांचा जिल्हयात मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार बाधित आलेल्या 13 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील 7, चंद्रपूर तालुका 0, बल्लारपूर 1, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0, नागभिड 0, सिंदेवाही 0, मूल 2, सावली 0, पोंभूर्णा 1, गोंडपिपरी 1, राजूरा 1, चिमूर 0 , वरोरा 0, कोरपना 0, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत झालेल्यांमध्ये सिंदेवाही तालुक्यातील 1 महिला तर वणी-यवतमाळ येथील 1 महिलेचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 84 हजार 605 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 82 हजार 539 झाली आहे. सध्या 542 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5 लाख 45 हजार 234 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4 लाख 57 हजार 812 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1524 बाधितांचे मृत्यू झाले आहे.
प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Advertisements

Check Also

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*

*जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*   चंद्रपूर, दि. 19 मार्च : जिल्ह्यात …

  ‘‘ दि काश्मिर फाईल्स’’ प्रत्येक भारतीयांनी बघावा असा चित्रपट – हंसराज अहीर

  370, 35ए कलम हटविल्याने भविष्यात अशा राष्ट्रविरोधी कृत्याला थारा नाही.   ‘‘ दि काश्मिर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *