नवीन नियमावली…सोमवारपासून चारनंतर संपूर्ण महाराष्ट्र बंद! , –  राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश

Advertisements
Advertisements

नवीन नियमावली…सोमवारपासून चारनंतर संपूर्ण महाराष्ट्र बंद!
   –  राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश
–  विदर्भातील नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, बुलढाणा, अकोला, अमरावती जिल्ह्यामध्ये नवे निर्बंध
मुंबई,
महाराष्ट्र राज्यात कोरोनाची आकडेवारी कमी झाल्यानंतर राज्य सरकारने पाच टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल केले. या निर्णयाचा  उलट परिणाम होईन,  निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याची आकडेवारी समोर आली.  तसेच  राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका  वाढू लागल्यामुळे,  आता  राज्य सरकारकडून नवीन नियमावली जरी करण्यात आली असून, त्यानुसार दुपारी ४ वाजे नंतर सर्व काही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आधीच्या नियमावलीमध्ये बदल करण्यात आला आहे. सोमवारपासून नवीन नियमांचे  पालन करावे लागणार आहे. सोमवारपासून सर्व अत्यावषक सेवा अंतर्गत दुकाने आठवड्यातील सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. तर अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत सुरु राहतील तर शनिवार रविवार पूर्णपणे बंद राहणार आहेत.
– मॉल्स, सिनेमागृहं संपूर्ण बंद.
– रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या पन्नास टक्के क्षमतेने आणि शनिवार       रविवार फक्त पार्सल सेवा 11 पर्यंत.
– उद्याने, मैदाने, जॉगिंग, रनिंग आठवड्यील सर्व दिवस पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत.
– खाजगी कार्यालयं कामाच्या दिवशी पन्नास टक्के क्षमतेने दुपारी चार वाजेपर्यंत.
– अत्यावश्यक सेवा संबंधी शासकीय कार्यालयं शंभर टक्के क्षमतेने.
– लग्नसमारंभाला 50 लोकांच्या उपस्थितीची परवानगी, कोविडसंबंधी सर्व नियम पाळणं आवश्यक
– अंत्यसंस्कार, दशक्रिया विधी व त्यासंबंधित कार्यक्रमांना 20 लोकांच्या उपस्थितीची परवानगी
– पुण्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद, धार्मिक स्थळांवर नित्योपचार पूजेला परवानगी
– कृषी संबंधित दुकाने आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील

नव्या नियमानुसार अत्यावश्यक वगळता इतर सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवारी सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत खुली राहतील. हॉटेल आणि रेस्टॉरंटही दुपारी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. त्यानंतर पार्सल किंवा टेक अवे पद्धतीने सुरू ठेवता येतील. मॉल आणि मल्टिप्लेक्स यांना मात्र कोणत्याही प्रकारे सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आलेली नाहीये. कल्याण डोंबिवलीत सर्व व्यवहार सायंकाळी वाजेपर्यंतच सुरू राहतील तर दुकाने सायं 4 वाजेपर्यंतच सुरू ठेवता येतील.त्यामुळे संध्याकाळी 5 नंतर बाहेर फिरण्यावर बंधने आली असून बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.मॉल, चित्रपटगृह आणि नाट्यगृह बंद असतील.उपहारगृहे पूर्वीप्रमाणे मात्र क्षमतेच्या 50 टक्के सायंकाली 4 वाजेपर्यंतच खुली ठेवता येतील.सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत सकाळी फिरता येईल. याच वेळेत मैदाने खुली राहतील, सायकलिंग करता येईल. खाजगी कार्यालयंही 50 टक्के क्षमतेसह 4 वाजेपर्यंत खुली ठेवता येतील. सरकारी कार्यालयंही 50 टक्के क्षमतेसह 4 वाजेपर्यंत खुली राहतील. लग्न समारंभ आयोजित करताना हॉलच्या क्षमतेनुसार 50 टक्के क्षमता वापरता येईल. असे 4 जून रोजी काढलेले स्तर 3 चे निर्बंध सर्वत्र लागू राहणार आहेत. सोमवार 28 जून ते 5 जुलैपर्यंत त्यांची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.

नागपूर :
सोमवारपासून अत्यावश्यक वस्तूंची दुकाने दररोज फक्त ४ वाजे पर्यंतच सुरु राहतील.  इतर दुकाने शनिवार – रविवार ४ वाजे पर्यंतच सुरु. सार्वजनिक स्थाने / मोकळी मैदानी / चाल / सायकलिंग दर दिवशी सकाळी ५ ते ९ पर्यंत

यवतमाळ :
ब्रेक द चेनअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यासाठी 28 जूनपासून नवीन आदेश काढण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवेची दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. सोमवार ते शुक्रवारपर्यंत 4 वाजेपर्यंत दुकाने उघडण्याची वेळ असणार आहे. तर शनिवार रविवार पूर्णतः बंद असणार आहे. हॉटेल रेस्टॉरंट 4 वाजेपर्यंत, बँक 4 वाजेपर्यंत सुरु असणार आहे. तर शाळा कॉलेज, शिकवणी, मंदिर पूर्णपणे बंद असणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आदेश जारी केले आहेत.

चंद्रपूर :
सोमवारपासून जीवनावश्यक व बिगर जीवनावश्यक दुकानांची वेळ आता सकाळी 7 ते दुपारी 4 बिगर जीवनावश्यक दुकाने शनिवारी आणि रविवारी बंद.

बुलढाणा:
सोमवारपासून जीवनावश्यक व बिगर जीवनावश्यक दुकानांची वेळ आता सकाळी 7 ते दुपारी 4 बिगर जीवनावश्यक दुकाने शनिवारी आणि रविवारी बंद.

अकोला :
सोमवारपासून जीवनावश्यक व बिगर जीवनावश्यक दुकानांची वेळ आता सकाळी 7 ते दुपारी 4 बिगर जीवनावश्यक दुकाने शनिवारी आणि रविवारी बंद.

अमरावती :
सोमवारपासून जीवनावश्यक व बिगर जीवनावश्यक दुकानांची वेळ आता सकाळी 7 ते दुपारी 4 बिगर जीवनावश्यक दुकाने शनिवारी आणि रविवारी बंद.

Advertisements

Check Also

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*

*जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*   चंद्रपूर, दि. 19 मार्च : जिल्ह्यात …

  ‘‘ दि काश्मिर फाईल्स’’ प्रत्येक भारतीयांनी बघावा असा चित्रपट – हंसराज अहीर

  370, 35ए कलम हटविल्याने भविष्यात अशा राष्ट्रविरोधी कृत्याला थारा नाही.   ‘‘ दि काश्मिर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *