गडचांदूर तालुक्यासाठी ३ दशकापासून संघर्ष. “पुन्हा निवेदन.”,शासनाकडून नेहमीच आश्वासनांचे लॉलीपॉप, नागरीकात संतापाची लाट

Advertisements
Advertisements
गडचांदूर तालुक्यासाठी ३ दशकापासून संघर्ष. “पुन्हा निवेदन.”
(शासनाकडून नेहमीच आश्वासनांचे लॉलीपॉप, नागरीकात संतापाची लाट.)
कोरपना ता.प्र.:-
       कोरपना तालुक्यातील सर्वात मोठे शहर गडचांदूरची लोकसंख्या अंदाजे ४० ते ४५ हजारांच्या जवळपास आहे.या शहराला तालूक्याचा दर्जा मिळावा म्हणून मागील अंदाजे ३ दशकांपासून सतत संघर्ष सूरू आहे. परंतू नेहमीच शासनकर्ते निव्वळ आश्वासनांचे लॉलीपॉप देत असल्याने नागरिकांकडून नाराजीचे सूर उमटत आहे.२ जुलै रोजी पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार हे गडचांदूर येथे विवीध विकासकामाचे लोकार्पण व भुमिपूजन कार्यक्रमात आले असता गडचांदूर तालुका संघर्ष समिती संघटक उद्धव पुरी यांनी “तालुका निर्मिती” साठी पाठपुरावा करून मागणी पुर्ण करण्याची विनंती मंत्री महोदयांना निवेदनाद्वारे केली आहे.
      गडचांदूर येथील नगरपरिषदेला(क) वर्ग दर्जा प्राप्त असून राजूरा,कोरपना व जिवती हे तिन्ही तालुके या शहराच्या प्रत्येकी २५ किमीच्या अंतरावर आहे. गडचांदूर हे मुख्य केंद्रबिंदू व मोठी बाजारपेठ तसेच औद्योगिक दृष्ट्या गजबजलेला शहर असल्याने तहसील कार्यालयासाठी उपयुक्त व सोईचे ठिकाण असून शासनाला येथून मोठा महसुल मिळतो. गडचांदूर पोलीस स्टेशन हद्दीतील २४ ग्रामपंचायत अंतर्गत ५२ गावांचा समावेश असून त्या सर्व गावातील लोकांना गडचांदूर हे शहर अगदी सोईचे आहे.यासाठी येथे तालुक्याची निर्मिती होणे अत्यंत गरजेचे.असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
        गडचांदूर तालुका संघर्ष समिती अध्यक्ष तुळशीराम भोजेकर,सचिव अशोक कुमार उमरे, मुख्य संघटक उद्धव पुरी,कोषाध्यक्ष डॉ. भोयर इत्यादींनी याभागातून तालुक्याची मागणीला घेऊन २०११ मध्ये पहिला मोर्चा नागपूर विधानभवनावर काढला होता. तेव्हापासून सतत मोर्चे,आमरण उपोषण, हस्ताक्षर मोहिम,जनजागृती अशा अनेक प्रकारची आंदोलने सुरू आहे.परिसरातील ५२ गावातील सर्वपक्षीय नेते मंडळी व नागरिकांना सोबत घेऊन गेल्या दहा वर्षांपासून सदर मागणी रेटून धरली असून जनतेच्या तीव्र भावना व गडचांदूर तालुका संघर्ष समितीच्या विविध आंदोलनाची सकारात्मक दखल घेऊन गेल्या अनेक वर्षांपासून शासनस्तरावर प्रलंबित मागणीचा पाठपुरावा करून सदर मागणी मंजूर करावी अशी विनंती वजा मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.आतातरी मागणी पूर्ण होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Advertisements

Check Also

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*

*जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*   चंद्रपूर, दि. 19 मार्च : जिल्ह्यात …

  ‘‘ दि काश्मिर फाईल्स’’ प्रत्येक भारतीयांनी बघावा असा चित्रपट – हंसराज अहीर

  370, 35ए कलम हटविल्याने भविष्यात अशा राष्ट्रविरोधी कृत्याला थारा नाही.   ‘‘ दि काश्मिर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *