Breaking News

आर्वी:आमदार दादाराव केचे यांनी रामपुर येथे केली भाजपा शाखा स्थापित

Advertisements
Advertisements

जिल्हा प्रतिनिधी वर्धा;आर्वी:-आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादाराव केचे यांनी रामपुर येथे भारतीय जनता पक्ष स्थापित करून शाखा फलकाचे अनावरण केले. अशोक निकम यांनी स्थानिक कार्यकर्त्यांसोबत संपर्क साधून गावाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी भारतीय जनता पक्षाची रीतसर स्थापना केली.

आमदार दादाराव केचे यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करते वेळी सांगितले की, आर्वी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी प्रत्येक गावातील इतंबूत समस्या माहिती असने आवश्यक आहे. समस्या ऐकून त्यावर उपाय योजना करून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करून गावांचा सर्व समावेशक सर्वांगीण विकास साध्य करता येईल. भारतीय जनता पक्ष हा एक परीवार असुन प्रथम राष्ट्र नतंर स्वतः या तत्त्वावर संपुर्ण विधानसभा क्षेत्रात काम करणारे असंख्य कार्यकर्ते निर्माण केले आहेत. रामपुर गावाचा सर्वांगीण विकास साध्य करण्यास महत्वाची ठरेल असे कामे येथील मागणीनुसार करण्यात येईल.

या प्रसंगी अशोक निकम, मंगेश सुटकर शाखा अध्यक्ष, सुधाकर कासार शाखा उपाध्यक्ष , सुशिल सुटकर शाखा सचिव, शंकर मुंडेकार, अंकुश सुटकर, संजय बुरकुटे, कैलास मुंडेकार, अनंता तलवारे, रामदास गवते, धनराज सुटकर, राजेश कासार, विलास सुटकार यांच्या सहीत गावकऱ्यांची उपस्थिती होती.

Advertisements

Check Also

*प्रहार जनशक्ती पक्ष ची सालोड हिरापूर येथे आज मोठ्या ताकतीने शाखा स्थापन*  रक्तदान करून शाखेचे उद्घाटन

    *मा.ना राज्यमंत्री श्री. बच्चू भाऊ कडू* यांचे विचार व कार्य गावा गावात घरा …

 *आवास दिनाच्या निमित्ताने “गृह प्रवेश” कार्यक्रम संपन्न

    वर्धा; प्रतिनिधी;५ जून २०२१रोजी आवास दिनाच्या निमित्ताने महाआवास अभियानातंर्गत महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *