Breaking News

वर्धा : महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिव पुरस्कारसाठी अर्ज आमंत्रित:समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त

Advertisements
Advertisements

वर्धा, जिल्हा प्रतिनिधी सचिन पोफळी :- दि. 7  :- विरशैव-लिंगायत समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास होण्यासाठी कलात्मक समाज प्रबोधन व साहित्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या कलावंत, साहित्यिक, समाज प्रबोधनकार व समाज सेवकांना आणि यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिव पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे.

सदर पुरस्कार दोन गटात दिले जाणार आहे. त्यातील व्यक्तीगत पुरस्कार 25 हजार रोख तर संस्थात्मक पुरस्कार 51 हजार रुपये रोख व सन्मानपत्र, स्मृती चिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

व्यक्तीगत पुरस्कारासाठी अर्जदार व्यक्तीने विरशैव-लिंगायत समाजाकरिता कलात्मक व साहित्यिक क्षेत्रात किमान 10 वर्षे कार्य केलेले आसावे. अर्जदार पुरुषाचे वय किमान 50 वर्षे व स्त्रियांचे किमान 40 वर्षे इतके असावे. पुरस्कारासाठी कोणत्याही समाजातील व्यक्तीचा विचार करण्यात यईल.

संस्थात्मक पुरस्कारासाठी संस्था नोंदणीकृत असावी, स्वयंसेवी संस्थेने समाज कल्याण क्षेत्रात विरशैव-लिंगायत समाजाच्या उन्नतीसाठी शैक्षणिक, आर्थिक विकास होण्यासाठी कलात्मक, समाज प्रबोधन व साहित्य क्षेत्रात कार्य, अन्याय निर्मुलन, अंधश्रध्दा निर्मुलन इत्यादी क्षेत्रात किमान 10 वर्षे काम केलेले असावे.

स्वयंसेवी संस्था राजकारणापासून अलिप्त असावी. उपरोक्त अटी व शर्ती पुर्ण करणाऱ्या व्यक्ती व संस्थानी विहीत नमुन्यातील अर्ज तिन प्रतित 31 जानेवारी पुर्वी कार्यालय, सहायक आयुक्त, समाज कल्याण, वर्धा येथे पाठवावे. अर्जाचा नमुना व अधिक माहितीसाठी कार्यालयात संपर्क साधावा, असे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकर्णी यांनी कळविले आहे.

Advertisements

Check Also

कोविड १९ कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल त्या मुलामुलींचे पालकत्व मेघे समूह उचलणार – डॉ. अभ्युदय मेघे

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे पत्रकार परिषदेचे आयोजन: ज्या कुटुंबातील कर्त्या …

आशा कर्मचारी व गटप्रवर्तक महिलांना स्थायी वेतन दया- आमदार डॉ.पंकज भोयर

आशा कर्मचारी व गटप्रवर्तक महिलांना स्थायी वेतन दया-  आमदार डॉ.पंकज भोयर आरोग्य मंत्री टोपे यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *