माझं हास्य कुणाच्याही दु:खाचं मूळ ठरू नये!

Advertisements
Advertisements

चार्ली चॅपलिनच्या [charlie chaplin] अभिनयाने खळाळून हसला नाही, असा व्यक्ती जगात क्वचितच आढळेल. चार्ली चॅपलिनबद्दल बोलताना कोणाच्याही डोक्यात एक विनोदी पात्र उभे राहते; पण अनेकांना हसवणाºया या चेहºयामागचे दु:ख कोणाला फारसे माहित नसेल. चार्ली चॅपलिन एकदा म्हणाले होते की, माझं दु:ख एखाद्याच्या हसण्याचं कारण असू शकतं; पण माझं हास्य कोणाच्याही दु:खाचं कारण ठरू नये. त्यांच्याबाबत काही रंजक गोष्टी जाणून घेऊयात.

चार्ली यांचा जन्म १६ एप्रिल १८८९ रोजी लंडनमध्ये झाला होता. त्यांचे पूूर्ण नाव चार्ल स्पेन्सर चॅपलिन असे होते. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारच हालाखीची होती. पोट भरण्यासाठी त्यांना वयाच्या नवव्या वर्षीच नोकरी करावी लागली. बालपणीच त्यांचे आईवडील अलग झाले. यानंतर त्यांच्या आईची मानसिक स्थिती बिघडली. परिणामी वयाच्या १३ वर्षी चार्ली यांचे शिक्षणही सुटले.
चार्ली यांनी लहान वयातच नाटक आणि विनोदी कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. अवघ्या १९ व्या वर्षी एका अमेरिकन कंपनीने त्यांच्याशी करार केला आणि ते अमेरिकेला रवाना झाले. चार्ली चॅपलिन यांनी अभिनयाची सुरुवात अमेरिकेत केली. १९१८ सालापर्यंत ते जगातील लोकप्रिय चेहरा बनले होते.
१९१४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘मेकिंग अ लिव्हिंग’ हा मूकपट त्यांचा पहिला चित्रपट होता. १९२१ मध्ये आलेली ‘द किड’ ही त्यांची पहिली फीचर फिल्म ठरली. चार्ली यांनी अ वूमन आॅफ पॅरिस, द गोल्ड रश, द सर्कस, सिटी लाईट्स, मॉर्डन टाईम्स यासारख्या प्रसिद्ध आणि यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले. हे चित्रपट आजही पसंत केले जातात. चार्ली यांनी आपल्या आयुष्यात दोन महायुद्ध पाहिली. ज्यावेळी जग युद्धाची झळ सोसत होत, त्यावेळी चार्ली लोकांना हसवत होते.
आयुष्यही वादात
खासगी आयुष्यासोबतच चार्ली यांचे व्यावसायिक आयुष्यही चर्चेत आणि वादग्रस्त होते. १९४० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द ग्रेट डिक्टेटर’ चित्रपटाने फारच वाद झाला होता. यात चार्ली यांनी जर्मनीचा चॅन्सलर हुकुमशाह अ‍ॅडॉल्फ हिटलरची व्यक्तिरेखा साकारली होती. यानंतर अमेरिकेत त्यांच्यावर कम्युनिस्ट असल्याचा आरोपही झाला. इतकेच नाही तर एफबीआयकडून त्यांची चौकशीही झाली. यानंतर चार्ली यांनी अमेरिकेला कायमचा रामराम केला आणि स्वित्झर्लंडमध्ये स्थायिक झाले.
चार्ली चॅपलिन यांनी त्यांच्या कौटुंबिक आयुष्यात फारच उलथापालथ पाहिली. त्यांनी एकूण चार लग्न केली होती. या लग्नातून त्यांना ११ अपत्ये झाली. त्यांनी पहिले लग्न १९१८ मध्ये मिल्ड्रेड हॅरिससोबत केले; पण हे लग्न दोन वर्षेच टिकले. यानंतर त्यांनी लिटा ग्रे, पॉलेट गॉडर्ड आणि १९४३ मध्ये १८ वर्षांच्या उना ओनिलसोबत संसार थाटला. त्यावेळी चार्ली ५४ वर्षांचे होते. चार्ली चॅपलिन यांची चारही लग्न फारच वादात राहिली होती.
महात्मा गांधींचे चाहते
प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन आणि ब्रिटनची महाराणी यांसारखे दिग्गज चार्ली चॅपलिन यांचे चाहते होते. तर स्वत: चार्ली भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील महात्मा गांधी यांच्या कार्यावर अतिशय प्रभावित होते. ते महात्मा गांधी यांचा नितांत आदर करत होत. बॉलिवूड कलाकारही चार्ली यांचे चाहते होते. राज कपूर यांनी आपल्या चित्रपटांत चार्ली चॅपलिन यांची कॉपी केली होती.
२५ डिसेंबर १८७७ रोजी वयाच्या ८८ व्या वर्षी चार्ली चॅपलिन यांचे निधन झाले; परंतु मृत्यूच्या दोन महिन्यानंतर काही लोकांनी त्यांचा मृतदेह चोरला होता. त्याचे कॉफिनच चोरल्याचे चौकशीतून समोर आले. चार्ली यांच्या कुटुंबियांकडून खंडणी मागण्याच्या उद्देशाने मृतदेहाची चोरी करण्यात आली होती. चोरांनी ६ लाख स्विस फ्रँक्सची मागणी केली होती; परंतु त्यांच्या पत्नीने ही रक्कम देण्यास नकार दिला होता. नंतर मात्र त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. यानंतर चोरीपासून वाचवण्यासाठी त्यांचा मृतदेह सहा फूट कॉंक्रिटच्या खाली दफन करण्यात आला. (स्रोत: गूगल)

Advertisements

Check Also

How to Purchase Term Papers That Are Right For Your Organization

A lot of folks go on the internet to buy term papers and then they …

Write My Essay For Me – How to Find the Best Online Essay Writing Service

If you’re in search of an online service to help me write my essay it …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *