शिवारातील आमराई झाल्यात उजाड

Advertisements
Advertisements

शेतकºयांचा आपल्या झाडाझुडपांवर भारी जीव असता़े शेतकरीच काय पण सामान्य गावकरीही झाडांवर तितकाच प्रेम करतो़ ज्याच्या घरी वावर नाहीत, तोही झाडांना जोपासतो़ गावशिवारात बाभूळ, कडुलिंब, सुबाभूळ, पळस, आवळा, आंबा, उंबर, कवठ, चिंच, बोर अशी कितीतरी प्रकारची झाडे असतात़ लहान-मोठी झाडे तर वेगळीच! बाभळाची तर बनच बन असतात, तशी कडुलिंबांचीही मोठी रांग दिसून येते़ नदीच्या काठी आणि पडीक जमिनीत बोरीच बोरी दिसून येते़ कुणी धुºयावर ही झाडे लावतो,तर कुणी आपल्या पडतात त्यांची लागण करतो़ झाडं कोणतंही असो ते कुठं आणि कसं कामास येईल, हे सांगता येत नाही़
आंब्यांची झाडं तर शिवाराची शान असते़ कोणत्याही गावाभोवताल आमराई असतेच़ कुण्याच्या धुºयावरही ही झाडे आढळून येतात़ आंब्यांची झाडे वाढण्यास आणि फळ येण्यास मोठा कालावधी घेत असल्यामुळे अनेकजण आता कलमी आंब्याकडे वळले आहेत़ मात्र, गावरानीची चव जशी हायब्रिडला नसते, तशी चव कलमीला नसतेच, हे मान्य करावेच लागते़
विदर्भातील गोंदिया ते मध्यप्रदेशातील रजेगांव या राज्यमार्गावर तर आंब्याची मोठमोठी झाडे आहेत़ काही प्रमाणात की तोडली गेली आहेत. राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागानेही ग्रामीण रस्त्याचे जाळे तयार करताना रस्त्याच्या बाजूला बाभळी, कडुलिंब, आंबा आदी अनेक प्रकारची झाडे लावली आहेत़
शिवारात असायची तशी चिंचेची झाडं गावातही असायची़ आपल्या मुळा जमिनीत घट्ट आणि खोलवर रुजवणारे हेच एकमेव झाड असावे़ फांद्या अत्यंत दाट असल्याने पक्ष्यांचा तो मोठा निवारा असतो़ पाऊस, ऊन्हं आणि हिवाळ्यातील थंडीपासून संरक्षण करणारं हे झाडं आहे़ अखजीला ‘चिचुणी’ करण्यासाठी कुण्या दुकानात जावं लागत नाही़ चिंचेच्या कोवळा पाला खाण्यात काय मजा होती़ सुटीच्या दिवशी शाळेतील पोरंपोरी दिवसभर चिंचेच्या झाडाखाली असायच्या़ दहा दगड मारल्यानंतर पाच दगडात पंधरा तुकडे पडायचे़ आपल्या वर्गातल्या पोरीवर ‘इम्प्रेशन’ मारण्यासाठी चिंचा पाडण्यात पोट्टे वस्ताद होते़ एखाद्याच्या दगडानं कुणाचं डोकं फुटल्यास त्याबदल्यात चिंचा देऊन समजावणी केली जाई़
विदर्भात प्रत्येक गावात आमराई होती, आहे असं म्हणण्याचं धाडस आता करता येणार नाही़ आपल्या गावातील ग्राहकांची गरज भागवून उरलेल्या आंब्यांची विक्री करण्यात येत होती़ वावरातील खरिपाची कामे करताना शेतकºयाची एक ‘जीवनसाथी’ म्हणजे भाकरीची शिदोरी़ पहाटे पाच सुमारास घरातून आपल्या बैलांसह वावरात निघालेला शेतकरी शिदोरी घेऊनच निघालेला असतो़ वखरवाहीत व्यस्त असल्याने कधीकधी रात्रीचीही भाकर न्यावी लागते़ साधारणत: सकाळी नऊच्या सुमारास तो शिदोरी सोडतो़ त्यापूर्वी तो आपल्या शेताच्या मध्यभागी असलेल्या झाडाची दोन-चार आंबे दगडं मारून तोडतो़ भाकरी-भाजीच्या घासासोबत कांदा तोंडी लावतो तशीच आंब्याची फोडही! या साºयांचा एक घासच जगातल्या पक्वान्नांहून सरस ठरतो़ जरा अनुभव घेऊन बघा़
पाण्याच्या दोन-चार घोटाबरोबर हा शेतकरी श्रम करतो, मेहनत करतो़ तृप्तीची ढेकर दिल्यानंतर थोडीशी सुस्ती आल्याने त्याच आंब्याच्या झाडाखाली तो दोन क्षण डोळे लावतो़ घरी परताना तो आणखी दोन-चार आंबे शिदोरीच्या थैलीत ठेवतो़ कारण दुपारच्या जेवणसाठी घरधनीनला आमरस करायचं असतं़
बाभळीच्या झाडाचंही तसंच़ हे झाडं कुणाला लावावं लागत नाही़ तो आपणच आपला रुजतो़ या झाडाचा कोणताही भाग बेकामी नाही़ पान, फुल, शेंग, लाकूड आणि अगदी काटे सुद्धा कुंपणाच्या उपयोगात येतं़ गरिबासाठी तर ते ‘कल्पवृक्ष’चं ठरतं़ घराची दारं, खिडक्या, मयाली, मांडवासाठी ‘डी’ अशी कितीतरी साहित्य एकटा झाड देतो़ अनेक कास्तकारांनी आपल्या पडतात बाभळांचे बन तयार करत असतात़ त्यातून मोठा फायदा मिळत असे़
मात्र, गेल्या काही वर्षांत चित्र बदलले़ माणूस नको तितका स्वार्थी बनला़ आणि त्याने निसर्गावरच कुºहाड उचलली़ लाकडाचा व्यवसाय करणाºयांनी आपली नजर गावांकडे वळवली़ अगोदरच नापिकीमुळे त्रस्त झालेल्या शेतकºयांनीही त्याच्या हाकेला ‘ओ’ दिली़ आपल्या पडतातील शेकडो झाडे त्याने अगदी कमी किंमतीत विकून टाकली़ कालपरवापर्यंत हिरवीगार दिसणारी जागा आता ‘बोडखी’ दिसू लागली़ धुरेही उजाड झाली़ बहर येत नाही म्हणून अनेक कास्तकारांनी आपल्या आमराई विकून टाकल्या़ झाडांशी असलेले नाते आणि आजोबा, पणजोबा, वडिलांनी आपल्या हातांनी लावलेली झाडे कवडीमोल पैशांत मोजली़ ज्यांना रुजण्यास कित्येक दिवसं लागलीत,आपल्या जगण्याचं महत्त्व पटवून देण्यास हजारो तास लागले, ती झाडे काही क्षणात जमीनदोस्त करण्यात आली़ आणि नियती बघा, हे सर्व आपण ‘याच देही याच डोळी’ बघितलं़ अगदी आदि आणि अंत सुद्धा!
शहरातले लाकडाचं टाल (वखारी) बघा़ हजारो टन ओली झाडे पडलेली दिसून येते. याकडे सरकारचे दुर्लक्ष आहेत आणि पर्यावरणवाद्यांचेही! केवळ सागवान तोडीला ‘लक्ष्य’ करून चालणार नाही, तर लहानातल्या लहान झाडाच्या तोडीला विरोध झालाच पाहिजे, तरच हा निसर्ग आपला आहे; अन्यथा अवेळी नाश हा ठरलेलाच!

Advertisements

Check Also

Different Kinds of Essays

Which are essays? An essay is, by general definition, a written piece that exhibit the …

How do you get free slots?

For several years casinos in Vegas have been offering free slots. But you won’t find …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *