धान खरेदी केंद्रातील ग्रेडरविरुद्ध एसीबी कारवाई

Advertisements
Advertisements

भंडारा : कांद्री येथील धान केंद्रातील ग्रेडर संजय नारायण उरकुडे (32 वर्षे) यांनी 1 हजार 500 रुपयांची एसीबी (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) पथकाने रंगेहात पकडले.
माहितीनुसार, तक्रारदार हे रा. जांब तह. मोहाडी जि. भंडारा येथील असून त्यांच्या वडिलाचे नावे चार एकर शेतजमीन तसेच काकाचे नावे दोन एकर शेतजमीन मौजा जांब येथे आहे. तक्रारदाराने सदरची शेती ठेक्याने घेऊन उन्हाळी हंगामात 210 पोती धानाचे उत्पन्न काढले आहे. सदरचे धान कांद्री येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर विक्रीकरिता नेले असता तेथील गे्रडर संजय नारायण उरकुडे यांनी 180 धानाचे पोती खरेदी केले. उर्वरित 30 धानाचे पोते खरेदी करण्यास नकार देत खरेदी केलेल्या धानाचा मोबदला म्हणून 13 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. यानंतर तक्रारदाराने भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली़ त्यावरून पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी यांनी अत्यंत गोपनियरित्या शहनिशा करून शासकीय आधारभूत केंद्रात 13 हजारांच्या तडजोडीअंती 1500 रुपयांची लाच रक्कम स्वीकारताना एसीबी पथकाने पकडले. याप्रकरणी आंधळगाव ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर व अप्पर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार, उपअधीक्षक महेश चाटे यांच्या मार्गदर्शनातील सदर कारवाईत पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी, कोमलचंद बनकर, सचिन हलमारे, पोशि कुणाल कढव, सचिन हुकले, चालक नापोशि दिनेश धार्मिक यांनी सहभाग नोंदवला.

Advertisements

Check Also

शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठीच बाजार समित्यांची निर्मिती – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठीच बाजार समित्यांची निर्मिती – पालकमंत्री विजय वडेट्टीवार Ø कोरपना येथील कृउबासच्या नवीन कार्यालयाचे …

गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर, मंडळातील मूर्ती ४ फूटांची, तर घरातील बाप्पा २ फुटांचा!

मंडळातील मूर्ती ४ फूटांची, तर घरातील बाप्पा २ फुटांचा! गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर संपूर्ण महाराष्ट्राला गणेशोत्सवाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *