Breaking News

उजेडाचे अध्यात्मिक महत्त्व…SAAY Pasaydaan

Advertisements
Advertisements

दिवाळी व उजेडाच्या या सणात सगळे लोकं दिवे, मेणबत्ती व लॅम्प वगैरे लाऊन उजेड करतात. हा सण श्री राम आणि सीताच्या १४ वर्षांच्या वनवासानंतर त्यांचे अयोध्या आगमन वर साजरा केला जातो. भारतात या सणांमध्ये लोक आपली घरं, दुकानं इत्यादी साफ करून सजवतात. हा सण शरद ऋतूच्या आगमनाचा पण प्रतीक आहे . आनंदाच्या या सणाला लोक एकमेकांना मिठाई वाटून एकत्र साजरा करतात. उजेडाच्या प्रतीक दिवाळीच्या सणाचा एक अध्यात्मिक पैलू सुद्धा आहे , जो आपल्याला हे समजवतो की आपल्या अंत:करणात पण परमेश्वराची ज्योती विद्यमान आहे,त्याचा अनुभव आपण आपल्या आत्माद्वारा करू शकतो.
प्रत्येक मनुष्याचे हे जन्मसिद्ध अधिकार आहे की तो आपल्या जीवनाचा परमेश्वराची ज्योतीची अनुभव करून, परत परमेश्वरात विलीन होऊ शकतो आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपल्या अंत:करणात परमेश्वराला पाण्याची तीव्र इच्छा असेल. परमेश्वराने जेव्हा आपल्याला या संसारात पाठवले तेव्हा त्यांनी परत येण्याचा मार्ग ही बनवला . त्यांनी प्रत्येक मनुष्याला काही स्वतंत्र अधिकार दिले आहेत . आपल्यापैकी जर कोणी त्यांना घरी परत नेहण्याची प्रार्थना करतो ,तर ते , ही प्रार्थना नक्कीच ऐकतात. आपली ही प्रार्थना कोणाच्या दबावामुळे नसावी. ज्या प्रकारे जर एखाद्या श्रीमंत माणूस आपला पैसा वाटू इच्छितो तर तो आपला पैसा प्रत्येकाला देत नाही, तो वाट बघतो आणि जे लोक त्याला हा पैसा मागतात त्यांना वाटतो. ज्या प्रकारे एक डॉक्टर फक्त त्याच पेशंटला बरा करतो, जो त्याच्याकडे आपले आजार घेऊन येतो आणि स्वत:ला बरं करण्याची विनंती करतो. त्याचप्रमाणे परमेश्वराकडे आपण सगळ्यांसाठी रुहानी खजाने आहेत. जर परमेश्वर हे खजाने त्यांना देतो, ज्यांना ह्याची इच्छाच नाहीये ,तर बहुधा ती लोकं स्वीकार सुद्धा करणार नाही आणि ते त्याच्या महत्त्वाला सुद्धा समजून घेणार नाहीत. कारण त्यांनी कधीच त्याच्यासाठी प्रार्थना केली नाही. परमेश्वर तोपर्यंत आपली वाट पाहतो जोपर्यंत आपण त्यांना मागत नाही. एकदा जर आपल्या मनात परमेश्वर-प्रेमाची तीव्र इच्छा जागृत झाली तर परमेश्वर नक्कीच ते मिळवण्यात आपली मदत करतील. फक्त मनुष्य योनीमध्येच आपण आपल्या आत्म्याचे परमेश्वरामध्ये मिलन करू शकतो; परंतु काहीच भाग्यवान लोकं असतात जी आपल्या जीवनात या उद्देशाला पूर्ण करतात.
आपण सगळे प्रभू प्रेमाच्या या आनंदाला प्राप्त करू शकतो.आपल्याला माणसाच्या जीवनाची सोनेरी संधी ना गमवून आपले लक्ष अंत:करणात करून परमेश्वराच्या ज्योतीला आपल्या आत जागवायचा आहे.
ज्या प्रकारे आपण दिवाळीला मेणबत्या वगैरे लावून उजेड करतो, त्याच प्रकारे जेव्हा आपण ध्यानात बसतो तेव्हा आपल्या अंत:करणात परमेश्वराच्या ज्योतीच्या उजेडाचे आपल्याला अनुभव होते. आपल्या ध्यानाला अंतर्मुख करण्याची ही विधी खूप सोपी आहे, ज्यामध्ये आपण आपल्या शरीराला शांत करून, आपले ध्यान दोन डोळ्यांच्यामध्ये शिवनेत्र वर एकाग्र करण्याबरोबर, आपल्या विचारांना सिमरनच्या (देवाच्या नावाचे जाप ) माध्यमातून शांत करून आपल्या अंत:करणात परमेश्वराची ज्योतीला जगवतो, ज्याच्या माध्यमातून आपली आत्मा आतल्या रुहानी मंडळांमध्ये प्रवास करत परमेश्वरामध्ये लीन होते. दिवाळीच्या या पवित्र सणाला फक्त बाहेरून उजेड करून आपण आनंदित ना होऊन, पण या आपण रोज ध्यान अभ्यासात वेळ देऊन,आपल्या अंत:करणात परमेश्वराच्या ज्योतीचे अनुभव करू आणि रोज दिवाळी सणाला आपल्या अंतकरणात साजरा करून कायमची सुख शांती अनुभव करू.

*****

Advertisements

Check Also

*ओबिसीचे राजकीय आरक्षण पूर्ववत येईर्यंत स्वस्थ बसणार नाही: हंसराज अहिर*

चंद्रपूर:- शिवसेना प्रांत सरकार आज संध्याकाळी इम्पेरिकल डेटा कोर्टाला दिला गेला आज माझा ओबीसी बांधवांतरण …

दारुबंदी उठल्यानंतर उद्भवत असलेल्या परिस्थीतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आ. जोरगेवार यांच्या पोलिस अधिक्षकांना प्रत्यक्ष भेटून सुचना!

          पाच दिवसांत विकल्या गेली एक कोटीच्या वर दारू ! मद्यपींची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *