Breaking News

पाच हजार तरुणी होणार सायबर सखी 

Advertisements
Advertisements

मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि रिस्पॉन्सिबल नेटिझम यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डिजिटल स्त्री शक्ती’ उपक्रम राबविण्यात येत असून याचा शुभारंभ उद्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. या उपक्रमांतर्गत मुंबईसह राज्यभरातील 10 शहरातील 5000 महाविद्यालयीन तरुणींना सायबर सुरक्षेचे मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण वेबिनारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.                                                                               मोबाईल, इंटरनेटच्या वाढत्या वापरासोबतच महिलांविरोधातील सायबर गुन्हे, फसवणूक यातही वाढ होत आहे. मुलींना सायबर विश्वातील सुरक्षित वापर आणि वावर याकरिता प्रशिक्षित करण्यासाठी ‘डिजिटल स्त्री शक्ती’ उपक्रम सुरु होत आहे. 16 ते 25 वयोगटातील महाविद्यालयीन तरुणींना इंटरनेटचा सुरक्षित उपयोग, गैरप्रकार झाल्यास कायदेशीर बाबी, मानसिक परिणाम, तांत्रिक फसवणूक आदीबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येईल. 100 वेबिनार मधून राज्याच्या 10 शहरातील 5000 तरुणींना ह्यसायबर सखीह्ण म्हणून प्रशिक्षित करण्यात येईल. शुभारंभाचा वेबिनार 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.  मंत्री ॲड. यशोमती ठाकूर मार्गदर्शन करतील. घन:श्यामदास सराफ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींसाठी आयोजित वेबिनारमधे सायबर क्षेत्रातील तज्ज्ञांसह मुंबई पोलिस सायबर शाखेच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकरही उपस्थित राहणार आहेत.

Advertisements

Check Also

नवीन नियमावली…सोमवारपासून चारनंतर संपूर्ण महाराष्ट्र बंद! , –  राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश

नवीन नियमावली…सोमवारपासून चारनंतर संपूर्ण महाराष्ट्र बंद!    –  राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश –  विदर्भातील …

राज्यात पुन्हा कठोर निर्बंध?; राजेश टोपेंचं मोठं विधान

राज्यात पुन्हा कठोर निर्बंध?; राजेश टोपेंचं मोठं विधान महाराष्ट्रात डेल्टा प्लसची नेमकी काय स्थिती; राजेश टोपेंनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *