Advertisements
Advertisements
बरसला श्रावण, बेधुंद श्रावण
भिजू रे सख्या चल ओला श्रावण
फुलली माती दरवळे गंध
रोमांची झुळूक भिजले अंग
आल्या सरी, माझ्या मनी
श्वास गातो प्रीतगाणी
पाहा अभिषेक हा मस्त आकाशी
मोहरून आली अवघी धरणी
झाले आता मस्तीत धुंद
सावरू कशी सांजवेळी
पारिजात
Advertisements