Breaking News

संगणक प्रशिक्षण केंद्रे सुरु करा : खासदार बाळू धानोरकर 

Advertisements
Advertisements
चंद्रपूर : कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मागील पाच महिन्यापासून अधिकृत संगणक प्रशिक्षण केंद्रे बंद आहेत. त्यामुळे या केंद्रातील कर्मचारी व मालकांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. . शेजारच्या जिल्ह्यांनी देखील हि संगणक  प्रशिक्षण वर्ग सुरु केली आहे. अती व शर्ती लावून चंद्रपूर जिल्ह्यातील अधिकृत संगणक प्रशिक्षण केंद्रे सुरु करण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांना केली आहे.
शासकीय स्तरावर विविध पदाच्या भरती प्रक्रिया तसेच इच्छुक उमेदवारांना एम. एस. सी. आय. टी अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करून प्रमाणपत्र मिळणे, प्रमाणपत्र शिवाय अधिकारी व कर्मचारी वंचित आहेत. त्यासोबतच या केंद्रात काम करणारे कर्मचारी व मालक याच व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. परंतु पाच महिन्यापासून बंद असल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.
राज्यातील जळगाव, नागपूर, नंदुरबार व शेजारच्या गडचिरोली जिल्हाधिकारी यांनी अटी व शर्ती टाकून परवानगी दिली आहे. त्याच प्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातील संगणक प्रशिक्षण केंद्रे सुरु करा अशी मागणी खासदार बाळू धानोरकर जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांना केली आहे.
Advertisements

Check Also

दुपारी १ वाजता निकाल लागूनही विद्यार्थी आणि पालकांना आपला निकाल पाहता आलेला नाही.

बोर्डाचा गलथान कारभार; चार तासानंतरही विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईना दहावीच्या निकालाच्या दोन्ही वेबसाईट तब्बल ३ तासांहून …

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन ▪️   चंद्रपूर ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजिकल सोसायटीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *