Breaking News

कोरोनाचे विघ्न दूर कर आमदार किशोर जोरगेवार यांचे विघ्नहर्ता श्री गणेशाला साकडे आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरी बाप्पा विराजमान

Advertisements
Advertisements
चंद्रपूर( रिपोर्टर) :  चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार  यांच्या घरीही आज गणेशजींचे आगमन झाले असून कोरोनाचे संकट पाहता अगदी साध्या पद्धतीने विधिवत रित्या त्यांच्या घरी बाप्पा विराजमान  झाले आहे. यावेळी विघ्नहर्त्याला  कोरोनाचे विघ्न दूर करण्याचे  साकडे आमदार किशोर जोरगेवार यांनी  घातले.
आज चंद्रपुरात शांततेत मात्र भक्तिमय वातावरणात घरगुती गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. यंदा कोरोनाचे सावट पाहता अगदी सध्या पध्दतीने गणपती उत्सव पार पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. गणेशभक्तांणीही याला प्रतिसाद दिल्याचे आज दिसून येत आले.
 दरम्यान दरवर्षी प्रमाणे यंदाही आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरी लाडक्या बाप्पांचे आगमन झाले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सहकुटुंब नव्या पाहुण्याची पूजा अर्चना केली. यावेळी अगदी सध्या पद्धतीने हा सोहळा पार पाडण्यात आला. सध्या जगावर कोरोनाचे सावट आहे. दिवसागणिक कोरोनाबाधीतांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे जगावरील कोरोनाचे विघ्न दूर कर असे साकडे आमदार किशोर जोरगेवार यांनी विघ्नहर्ता श्री गणेशाला घातले.
Advertisements

Check Also

दुपारी १ वाजता निकाल लागूनही विद्यार्थी आणि पालकांना आपला निकाल पाहता आलेला नाही.

बोर्डाचा गलथान कारभार; चार तासानंतरही विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईना दहावीच्या निकालाच्या दोन्ही वेबसाईट तब्बल ३ तासांहून …

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन ▪️   चंद्रपूर ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजिकल सोसायटीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *