Breaking News

येन्सा येथे शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया प्रशिक्षण. श्रद्धा दुसाने चा ऊपक्रम.

Advertisements
Advertisements

वरोरा –

सध्याच्या परिस्थितीत शाळा महाविद्यालयात शिक्षण प्रक्रिया बंद असल्याने क्रूषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे वर्क फ्राम होम कार्य सुरु आहे. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक स्वरूपात शेतकऱ्यांना शेतीच्या संदर्भात प्रशिक्षण देण्यासाठी क्रुषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी
कु. श्रद्धा शै. दुसाने यांनी येन्सा येथे ग्रामीण कृषि कार्यानुभव या शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत शेतकऱ्यांच्या बियाण्यांच्या दुबार पेरणीसाठी वाढत जाणाऱ्या समस्या लक्षात घेऊन बियाण्यांच्या प्रक्रिये संबधी सोशल डिस्टसिंग चे सर्व नियमांचे पालन करून  प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित केला  .
         येन्सा गावातील  पाच पाच असे गट करून दुसाने या विद्यार्थीने या प्रशिक्षण कार्यक्रमात शेतकऱ्यांना बीजप्रक्रियेचे महत्व, फायदे, तसेच बीजप्रक्रिया करतांना घ्यावयाची काळजी यांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय देशमुख, विषय तज्ञ प्रा. भक्ती भोयर, रावे ऊपक्रमाचे सत्र प्रभारी डॉ. इंद्रप्रताप ठाकरे, कार्यक्रम अधिकारी प्रा. दीपिका उके यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या कार्यक्रमात गावांतील शेतकरी विठ्ठल येसोकार, शामराव वाढई, मारोती कोल्हे, अमिन गुरगुले व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते.बीज प्रक्रियाची माहिती देत असताना येन्सा येथील शेतकरी वर्गानी दिलेल्या माहितीनुसार शेती ऊत्पादनाची काळजी घेणार असे मनोगते व्यक्त केली.
Advertisements

Check Also

दुपारी १ वाजता निकाल लागूनही विद्यार्थी आणि पालकांना आपला निकाल पाहता आलेला नाही.

बोर्डाचा गलथान कारभार; चार तासानंतरही विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईना दहावीच्या निकालाच्या दोन्ही वेबसाईट तब्बल ३ तासांहून …

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन ▪️   चंद्रपूर ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजिकल सोसायटीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *