पोंभूर्णा तालूक्यातील कापूस उत्पादक शेतकर्यांचा मोबदला त्वरीत द्या…

Advertisements
Advertisements

पोंभूर्णा तालूका मनसेची मागणी…

पोंभूर्णा प्रतिनिधी-
पोंभूर्णा तालूका प्रामुख्याने शेती व्यवसायावर अवलंबुन असून जास्तीत जास्त शेतकरी कापूस पिकाचि लागवड करतात .तसेच उत्पन्न झालेला कापूस वनीच्या जिनिंग कंपन्यामध्ये विकला जातो. परंतु याचा उर्वरीत मोबादला अजुनहि या शेतकर्यांना मिळाला नाही .त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून शेतकरी आर्थीक विवंचनेत सापडलेला आहे. झोनल ऑफिसरशी भ्रमणध्वनी वरून सवांद साधला असता त्यांनी शासनाकडुन निधी न आल्याचे स्पष्ट केले. मात्र तब्बल तिन महिन्यापासून मोबदला मिळाला नसून शेतकरी आत्महत्येसाठी प्ररावृत्त होत आहे. तेव्हा या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देवून शेतकऱ्यांना उचित मोबदला मिळवून दयावा अशी मागणी मनसेचे जिल्हासचिव किशोर मडगुलवार यांच्या नेतृत्वात मनसेचे पोंभूर्णा तालूकाध्यक्ष आकाश तिरूपतीवार यांनी निवेदनाद्वारे तहसिलदार पोंभूर्णा मार्फत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना केली आहे .सदर मागणी सात दिवसाचे आत पूर्ण न झाल्यास शेतकऱ्यांना घेवून मनसेतर्फे तिव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला .
यावेळेस मनसेचे पोंभूर्णा तालूका अध्यक्ष आकाश तिरूपतीवार,मनविसे पोंभूर्णा तालूका अध्यक्ष आशिष नैताम,तालूका सचिव अमोल ढोले,मनविसे तालूका उपाध्यक्ष राजेश गेडाम,तबरेज कुरेशी,रोशन भडके,अमित भडके आदि मनसैनिक उपस्थीत होते.

Advertisements

Check Also

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*

*जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*   चंद्रपूर, दि. 19 मार्च : जिल्ह्यात …

  ‘‘ दि काश्मिर फाईल्स’’ प्रत्येक भारतीयांनी बघावा असा चित्रपट – हंसराज अहीर

  370, 35ए कलम हटविल्याने भविष्यात अशा राष्ट्रविरोधी कृत्याला थारा नाही.   ‘‘ दि काश्मिर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *