रामदास तडस - वर्धा खासदार

ग्रामीण भागात कोविड-19 चाचण्यांचे प्रमाण वाढविणे गरजेचे, डिगडोह येथील {कंटेनमेंट झोन} प्रतिबंधात्मक क्षेत्राला खासदार रामदास तडस यांची भेट

Advertisements
Advertisements

नागरिकांनी घाबरुन न जाता शासनाच्या सुचनेनुसार स्वतःची काळजी घ्यावी.

 

वर्धा: जिल्हा प्रतिनिधी :- देवळीः शासनाच्या सुचनेनुसार काही विशिष्ट कालावधीकरिता प्रतिबंधात्मक क्षेत्राची निर्मीती केली आहे, नागरिकांची काळजी म्हणून कोविड-19 ला थांबविण्याकरिता नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे व प्रशासनाने देखील नागरिकांना सर्व प्रकारच्या आवश्यक बाबी पोहचविण्याकरिता समन्वय साधावा तसेच असे ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव जास्त प्रमाणात होऊ नये यासाठी प्रशासनाच्या वतीने ग्रामीण भागात कोविड-19 चाचण्यांचे प्रमाण वाढविणे गरजेचे असल्यपचे यावेळी खासदार रामदास तडस यांनी केले.

डिगडोह मधील भागातील 57 व्यक्तींची चाचणी केली असुन सहा व्यक्ती कोरोना बाधित झाल्यामुळे येथील काही भाग प्रतिबंधित करण्यात आला आहे. यामध्ये एकूण 21 घरे  बंदीस्त केली आहेत, ज्या मध्ये 88 लोकांचा समावेश आहे. प्रतिबंधीत क्षेत्रात नागरिकांना योग्य सोईसुविधा माहितीजाणून घेण्याकरिता आज खासदार रामदास तडस यांनी डिगडोह प्रतिबंधीत क्षेत्राला भेट दिली व सुविधांचा आढावा घेऊन संबंधित अधिकारी, आरोग्य विभाग, पोलिसविभाग याच्या सोबत चर्चा केली. नागरिकांच्या हितासाठी प्रशासनाने प्रतिबंधीत क्षेत्र निर्माण केले आहे, आपल्या स्वतः परिवाराच्या हितासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच या प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच त्यांना लागणा-या सर्व जिवणावश्यक वस्तुंचा पुरवठा नागरिकांच्या मागणीप्रमाणे त्वरीत कराव्या व प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरीकांची आरोग्य तपासनी वेळोवेळी करण्यात यावी व चाचण्याचे प्रमाण वाढविण्याकरिता आवश्यक उपाययोजना जिल्हा प्रशासनासोबत समन्वय साधुन करण्यात याव्या अश्या सुचना खासदार रामदास तडस यांनी उपस्थित अधिका-यांना दिल्या.

यावेळी देवळीचे पोलीस निरीक्षक लेव्हरकर, वैद्यकीय अधिकारी डाॅ. धमाने,  डिगडोहचे तलाठी मरसकोल्हे, देवळी तालुका भाजपा अध्यक्ष दशरथ भुजाडे, माजी सरपंच प्रविण येसनखेडे उपस्थित होते

Advertisements

Check Also

आधार कार्ड हरवला किंवा विसरला, मग लगेच असे करा डाऊनलोड

आधार कार्ड हरवला किंवा विसरला, मग लगेच असे करा डाऊनलोड मुंबई- आपल्या भारतात कोणत्याही शासकीय …

शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठीच बाजार समित्यांची निर्मिती – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठीच बाजार समित्यांची निर्मिती – पालकमंत्री विजय वडेट्टीवार Ø कोरपना येथील कृउबासच्या नवीन कार्यालयाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *