Breaking News

संपूर्ण नष्ट झालेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने ५० हजार रूपये एकरी आर्थिक मदत द्यावी – आमदार समीर कुणावार यांची कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या कडे मागणी

Advertisements
Advertisements

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या आज वर्धा जिल्हाच्या दौरावर आले असता जिल्हा परिषद सभागृहा समोरच आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या नेतृत्वात भाजप पदाधिकारी यांनी कृषीमंत्र्यांना सोयाबीनचे रोप दाखवत रोगांची दाहकता दाखवत एकरी ५० रूपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली आधीच पेरलेले बियाणे न उगवल्यांने  व दुब्बार पेरणीमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार लक्षवेधले त्याचप्रमाणे हिंगणघाट व समुद्रपुर तालुक्यासह एकुण ११ हजार धडक सिंचन विहिरीचे अनुदान थकीत असल्याचे व त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असलेल्यांचे निर्देशानास आणुन दिले व तातडीने धडक सिंचन विहिरीचे अनुदान देण्याची मागणी करण्यात आली तसेच सध्या जनावरांमध्ये लपी नावांच्या रोगाने थैमान घातले असून त्यावर उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले व छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत लाखों शेतकरी कर्जमाफी पासून वंचित आहेत या शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफीचा लाभ द्यावा व जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात अश्या शेतकऱ्यांकरीता ५०हजार रूपये देण्याचा शासन निर्णय अजून झाला नसून लवकरात-लवकर सदर शासन निर्णय घ्यावा अश्या विविध शेतकरी हिताच्या मागण्या केल्या असून शासनाने यावर उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार समीर कुणावार यांनी दिला आहे

Advertisements

Check Also

आधार कार्ड हरवला किंवा विसरला, मग लगेच असे करा डाऊनलोड

आधार कार्ड हरवला किंवा विसरला, मग लगेच असे करा डाऊनलोड मुंबई- आपल्या भारतात कोणत्याही शासकीय …

शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठीच बाजार समित्यांची निर्मिती – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठीच बाजार समित्यांची निर्मिती – पालकमंत्री विजय वडेट्टीवार Ø कोरपना येथील कृउबासच्या नवीन कार्यालयाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *