Breaking News

24 तासातील (सायंकाळी 7.15 वाजेपर्यंत) 222 नवीन कोरोना बाधीत

Advertisements
Advertisements
  • चंद्रपूर जिल्ह्यात (दि.3सप्टेंबर) गेल्या 24 तासात कोविड-19 मुळे आणखी तीन मृत्यू – आतापर्यंतची मृत्यूची संख्या 35
  • आतापर्यंतची कोरोना बाधित संख्या 3167

चंद्रपूर(दि.3सप्टेंबर):- जिल्ह्यात गेल्या 24 तासात 222 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली असून कोरोना बाधितांची एकूण संख्या आता 3 हजार 167 वर पोहोचली आहे. सध्या उपचार घेत असलेले 1 हजार 656 बाधित आहेत. तर आतापर्यंत 1 हजार 476 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी चंद्रपूर शहरात शकुंतला लॉन तर जिल्ह्याच्या अन्य तालुक्याच्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात जाऊन स्वतः आरोग्य तपासणी व नोंदणी करावी. जबाबदार नागरिक म्हणून बाहेरून आलेल्या प्रत्येक नागरिकांनी आपल्या नावाची नोंदणी व आरोग्य तपासणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यात 24 तासात तीन बाधितांचा मृत्यू झालेला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये आझाद चौक, तुकुम चंद्रपूर येथील 67 वर्षीय पुरूष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 28 ऑगस्टला पेंईंग क्राइस्ट हॉस्पिटल चंद्रपुर येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 2 सप्टेंबरला पेंईंग क्राइस्ट हॉस्पिटल चंद्रपूर येथे मृत्यू झाला आहे.

तसेच, 48 वर्षीय भानापेठ वार्ड चंद्रपूर येथील पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. 27 ऑगस्टला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 2 सप्टेंबरला रात्री बाधिताचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया होता.

तर, तिसरा मृत्यू हा 52 वर्षीय रहमत नगर चंद्रपुर येथील पुरुष बाधिताचा आहे. 20 ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भरती करण्यात आले होते. बाधिताला कोरोना व्यतिरिक्त न्युमोनिया आजार होता. आज 3 सप्टेंबरला सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 35 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापैकी, चंद्रपूर 31, तेलंगाणा एक, बुलडाणा एक आणि गडचिरोली 2 बाधितांचा समावेश आहे.

चंद्रपूर शहर व परिसरात सर्वाधिक कोरोना बाधित पुढे आले आहेत. 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील 115, चिमूर तालुक्यातील 4, पोंभूर्णा तालुक्यातील 3, बल्लारपूर तालुक्यातील 7, ब्रह्मपुरी तालुक्यातील 5, भद्रावती तालुक्यातील 7, मूल तालुक्यातील 5, राजुरा तालुक्यातील 10, वरोरा तालुक्यातील 4, सावली तालुक्यातील 40, सिंदेवाही तालुक्यातील 10, कोरपणा तालुक्यातील 3, गोंडपिपरी तालुक्यातील 9 असे एकूण 222 बाधित पॉझिटिव्ह ठरले आहेत.

चंद्रपूर शहरातील रामनगर, वडगाव, सिटीपीएस कॉलनी परीसर, रयतवारी, चिंचाळा एमआयडिसी परिसर, रामनगर, नगीनाबाग, भावसार चौक, घुटकाळा वार्ड, तुकूम, बंगाली कॅम्प, समाधी वार्ड, पठाणपुरा ठक्कर कॉलनी परिसर, भिवापुर वॉर्ड, आंबेडकर नगर बाबुपेठ, महर्षी कर्वे चौक, सरकार अपार्टमेंट परिसर, दडमल वार्ड, स्वावलंबी नगर, ओम कृपा अपार्टमेंट परिसर, पोलिस क्वॉटर परिसर, बिरसा मुंडा चौक, जल नगर वार्ड, जय हिंद चौक,जटपुरा वार्ड, छत्रपती नगर, गणेश नगर तुकुम, विठ्ठल मंदिर वार्ड, अष्टभुजा वार्ड, मित्र नगर, शक्तिनगर, बाबुपेठ वार्ड, पोलीस लाईन परिसर, बालाजी वार्ड, कोसारा, माता नगर परिसर, अंचलेश्वर वार्ड, लालपेठ कॉलनी परिसर, भानापेठ वार्ड, बाजार वार्ड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसर, घुग्घुस, सरकार नगर, गांधी चौक, नांदाफाटा, इंदिरानगर, बिनबा वार्ड, बिनबा गेट भागातून बाधित ठरले आहेत.

मुल तालुक्यातील गोवर्धन, गांगलवाडी, कोसंबी, ताडाळा येथील बाधित पुढे आले आहे. सावली तालुक्यातील पाथरी, व्याहाड बुज भागातून पॉझिटिव्ह ठरले आहेत.

बल्लारपूर तालुक्यातील गोकुळ नगर वार्ड, संतोषी माता वार्ड परिसर, बुद्ध नगर वार्ड, ओल्ड कॉलनी परिसर, रेल्वे वार्ड, कन्नमवार वार्ड,भागातून बाधित पुढे आले आहे. पोंभूर्णा येथून वार्ड नंबर 8 परिसर, जामखुर्द परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

वरोरा विकास नगर परिसर तर तालुक्यातील शेगाव, भागातून बाधित पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील खांबाडा, विरुर स्टेशन परिसर, जवाहर नगर परिसर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

भद्रावती तालुक्यातील डिफेन्स कॉलनी परिसर, गौतम नगर, राधाकृष्ण कॉलनी परिसर, अहिल्यादेवी नगर परिसर, डब्ल्यूसीएल कॉलनी परिसर भागातून बाधित पुढे आले आहे. गोंडपिपरी तालुक्यातील वडोली, भागातून बाधित पुढे आले आहे. ब्रह्मपुरी येथून तारगाव, हनुमान नगर परिसर, गांधीनगर परिसर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

चिमूर तालुक्यातील गांधी वार्ड परिसर, मासळ, भागातून बाधित पुढे आले आहे. कोरपणा तालुक्यातील एसीडब्ल्यू कॉलनी परीसर आवारपूर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

Advertisements

Check Also

*राज्यात कोरोना च्या चौथ्या लाटेचा धोका*

  सध्या कोरोनाच्या Omicron BA.2 व्हेरिएंटमुळे चीन आणि दक्षिण कोरियासह युरोप आणि आशियाच्या काही भागांमध्ये …

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*

*जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*   चंद्रपूर, दि. 19 मार्च : जिल्ह्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *