Breaking News

*झरी रेस्टहाऊस वर सस्पेंड ग्रामसेवकाचा कब्जा*

Advertisements
Advertisements

अधिका-यांची बघ्याची भुमिका
अवेध प्रकार होत असल्याची परिसरात चर्चा

चंद्रपुर(प्रतिनिधी)दिनांक- 03/09/2020चंद्रपुर पंचायत समिती अंतर्गत येणा-या कोळ्सा ग्रामपंचायत क्षेत्रातील झरी येथे ग्रामपंचायतच्या उत्पन्न वाढीकरिता उभारलेले विश्रामगृह , एका सस्पेंट ग्रामसेवकाने स्वतःच्या ताब्यात ठेवले असुन, अधिका-यांकडुन कुठल्याही प्रकारची कार्यवाही केल्या जात नाही. अधिकारी याबाबत बघ्याची भुमिका घेत आहे.
कोळसा ग्रामपंचायत ही ताडोबा जंगल परिसरात असुन, या परिसरात मोठ्याप्रमाणात पर्यटक जगंल भ्रमंती करिता येत असतात . कोळसा ग्रामपंचायत अंतर्गत उत्पन्न वाढीच्या दृष्टीने झरी यागावात जिल्हा परिषद अंतर्गत भव्य विश्रामगृह उभारले असुन,मात्र या विश्रामगृहाचा कुठलाही ग्रामपंचायतच्या उत्पन्नाकीरीता मदत होत नसुन, पुर्वी या परिसरात पुर्वी कार्यरत असलेल्या एका सस्पेड ग्रामसेवकाच्या अवेद रित्या ताब्यात असल्याचे बोलल्या जात आहे. या ग्रामसेवकाचा आजही विश्रामगृहावर ताबा असुन, स्वतःच्या गरजा भागविण्याकरीता याचा वापर करित आहे. अशा गैरप्रकारामुळे कोळ्सा ग्रामपंचायत विश्रामगृहापासुन मिळाणा-या आर्थिक उत्पन्ना पासुन आज स्थितीला वंचित आहे. ही बाब वरिष्ठ अधिका-यांना माहित असुन, सुद्धा आज पर्यंत कुठल्याच प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नसुन, अधिकारी निव्वळ बघ्याची भुमिका घेत आहे. या मुळेच सदर ग्रामसेवक वरिष्ठाच्या आशिर्वादाने झरीचे विश्रामगृहात ठाण मांडुन असल्याची परिसरात चर्चा आहे.या विश्रामगृहाचा अवेद कामाकरिता वापर होण्याची दाट शक्यता असुन, सदर विश्रामगृहा पासुन ग्रामपंचायत उत्पन्न कशी मिळ्वता येईल यासाठी पंचायत समितीच्या वरीष्ठ अधिकारी यांनी याप्रकरणी लक्ष घालुन, अवेद रित्या राहत असणा-या ग्रामसेवकावर कार्यवाही करावी. असे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे मागणी केलेली आहे.

Advertisements

Check Also

CBSE, ICSE 12th Exams : परीक्षा रद्दच, सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब!

CBSE, ICSE 12th Exams : परीक्षा रद्दच, सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब! देशात निर्माण झालेल्या करोनाच्या …

बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह सर्वासाठी खुले होणार

बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह सर्वासाठी खुले होणार चंद्रपूर, ता. २१ : बाबूपेठ येथील स्व. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे बहुउद्देशीय सभागृह येत्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *