Breaking News

*शिक्षक दिनी डी. एड. पदवीधर शिक्षकांचे लाक्षणिक उपोषण*

Advertisements
Advertisements

वर्धा (५ सप्टेंबर २०२०): *महाराष्ट्रात खाजगी माध्यमिक शिक्षकांचे व्यवस्थापन आधिनियम १९७७ व नियमावली १९८१ प्रमाणे चालते. माध्यमिक शिक्षकांची सेवाजेष्ठता नियम १२ अनुसुची फ परिच्छेद २ प्रवर्ग क मधील ४ मुद्दे व टिप १ ते१० प्रमाणे ठरवावी असे दिले आहे त्या नुसारच डी एड शिक्षक पदवी नतंर प्रवर्ग क मध्ये जातो.तशा प्रकारचे परिपत्रक राज्याचे राज्य शिक्षणमंत्री माननीय बच्चुभाऊ कडू यांच्या निर्देशानुसार व अवर सचिव यांच्या परिपत्रक दि३/५/२०१९ व पत्र दि १९/१०/२०१९ च्या अनुषांगाने अमरावती विभागाचे उपसंचालक ए एस पेदोंर साहेबानी त्यांच्या पाच जिल्हयासाठी काढले आहे .तसेच स्पष्ट परिपत्रक अवर सचिवांनी किंवा उर्वरित उपसंचालकांनी काढून संपूर्ण महाराष्ट्रात अमंलबजावणी करावी व डी एड पदवीधर शिक्षकांना न्याय दयावा .टिप २,५ व ८ चा वापर करून सामाईक सेवाजेष्ठता करावी .महाराष्ट्रातील शिक्षणाधिकाऱ्यांमध्ये सेवाजेष्ठता व पदोन्नोती बाबत एकवाक्यता असावी .यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील महाराष्ट्र माध्यमिक डी. एड. शिक्षक महासंघाच्या शिक्षकांनी शिक्षकांच्या सन्मानाच्या दिवशीच संपूर्ण महाराष्ट्रात घरात राहून लाक्षणिक उपोषण केले. प्राप्त माहिती शिक्षक व महाराष्ट्र माध्यमिक डी. एड. शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पद्मा तायडे यांनी दिली.*
*या उपोषणात समस्त महाराष्ट्रातील हजारो शिक्षक सहभागी झालेत.कार्याध्यक्ष नंदकिशोर गायकवाड* *महासचिव बाळा आगलावे , उपाध्यक्ष राजेंद्र मसराम,व सर्व विभागीय सचिव व सर्व पदाधिकारी यांनी व सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी व विविध जिल्ह्यांतील शेकडो* *शिक्षकांनी सहभाग नोंदवला.*
*आज महाराष्ट्रातुन हजारो शिक्षकांनी आपला सहभाग या उपोषणात नोंदवला.*
*वर्धा जिल्हा अध्यक्ष रेखा जुगणाके, सचिव अनिल आमझरे ,सावित्री नाखले, संगीता बोरगमवार, गजानन खराबे,लता हेडावू,किरण पांडे, उर्मिला चौधरी, निर्मला निखारे,विजय जुगणाके,अंजली कांबळे,संदिप पुनसे अशा अनेक शिक्षकांनी आपला सहभाग नोंदवला.
*अध्यक्ष*
*पद्मा तायडे*
*महाराष्ट्र माध्यमिक* *डी.एड.शिक्षक महासंघ*
(म.रा.)दि.५/९/२०२०

Advertisements

Check Also

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 4 हजार 700 कोटी : विजय वडेट्टीवार

नागपूर : सरकारी मदतीची वाट पाहणाऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. जून ते ऑक्टोबर या कालावधीत …

पत्रकारांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे – मंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचे प्रतिपादन

मुंबई ( प्रतिनिधी ) पत्रकारांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे असल्याचे प्रतिपादन राज्याचे नगरविकास तथा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *