Breaking News

IPL २०२० चं वेळापत्रक जाहीर

Advertisements
Advertisements

मुंबई-चेन्नईत होणार सलामीची लढत

जगभरातील क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा असलेल्या आयपीएलच्या १३व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. स्पर्धेतील पहिला सामना चार वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि तीन वेळा विजेतेपद ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान दुबईमध्ये आयपीएलचं ‘रनसंग्राम’ होणार आहे.

कोव्हिड-19 उद्रेकामुळे ही स्पर्धा मार्चऐवजी सप्टेंबरमध्ये होत आहे. IPL च्या नव्या वेळापत्रकानुसार, १९ सप्टेंबरला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स दरम्यान पहिला सामना होणार आहे. त्यानंतर ६ नोव्हेंबपर्यंत प्रत्येक संघाचे एकमेकांबरोबर सामने होतील. उपांत्यपूर्व फेरीतले सामने झाल्यानंतर १० नोव्हेंबरला अंतिम सामना रंगेल. प्राथमिक फेरीपासून अंतिम सामन्यापर्यंत सगळ्या सामन्यांची वेळी ही भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजताची असेल.

#Dream11IPL 2020 Schedule Announced champions @mipaltan will take on three-time champions, @ChennaiIPL in the season opener on September 19.

Advertisements

Check Also

वर्धा जिल्हयातील खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करण्याकरिता खेळाडूंना अधिकाधिक प्रोत्साहन देण्याची गरज – खासदार रामदास तडस

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातुन वर्धा जिल्हयातील माती विभागातील 10 व गादी विभागातील 6 कुस्तीपटूंना मानधनाचे वाटप वर्धा जिल्हा प्रतिनिधी :-  हिंगणघाटः भारत सरकारने क्रीडा व युवक कल्याण क्षेत्रात आमुलाग्र पणे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *