Breaking News

ठाकरे सरकारच्या चिंतेत वाढ; ऐन अधिवेशनात एका मंत्र्यासह आमदाराला करोना

Advertisements
Advertisements

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील आणखी एका मंत्र्याला करोनाचा संसर्ग झाला आहे. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करून याची माहिती दिली. तनपुरे यांच्याबरोबरच अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांचाही करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे अधिवेशनासाठी निघालेल्या आमदार दळवी यांना रस्त्यातूनच माघारी फिरावे लागले. अधिवेशन सुरू झाल्यानंतर एका मंत्र्यासह आमदाराला करोनाची लागण झाल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे.

पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर काही वेळातच राज्यमंत्री तनपूरे यांनी करोना रिपोर्टबद्दलची माहिती ट्विट केली. “करोनाला हरवून लवकरच तुमच्या सेवेत पुन्हा रूजू होणार, असं राष्ट्रवादीचे राहुरीचे आमदार आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेय की, “सतत फिल्डवर आहे. लोकांच्या संपर्कात आहे. कितीही बचाव केला, तरी शेवटी काल केलेल्या कोरोना चाचणीत रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तब्येत अगदी व्यवस्थित आहे, काळजी करण्याचे कारण नाही. मी स्वतः काळजी घेत आहे. आपणही स्वतःची काळजी घ्या,” अशी माहिती त्यांनी दिली.

शिवसेनेचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी अधिवेशनाला हजेरी लावण्यासाठी मुंबईकडे निघाले होते. धरमतर खाडी पुलापर्यंत आले असताना दळवी यांच्या करोना चाचणीचा अहवाल मेसेजद्वारे आला. महेंद्र दळवी करोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. करोनाचा संसर्ग झाल्याचे समजताच ते तात्काळ माघारी फिरले. कोणतीही लक्षणं नाहीत. मात्र, खबरदारी म्हणून पुढील १० दिवस ते घरीच क्वारंटाईन राहणार आहेत. संपर्कातील व्यक्तींनी करोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केलं आहे.

सतत फिल्डवर आहे, लोकांच्या संपर्कात आहे. कितीही बचाव केला तरी शेवटी काल केलेल्या कोरोना चाचणीत रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तब्येत अगदी व्यवस्थित आहे, काळजी करण्याचे कारण नाही. मी स्वतः काळजी घेत आहे. आपणही स्वतःची काळजी घ्या.
कोरोनाला हरवून लकवरच तुमच्या सेवेत पुन्हा रूजू होणार.

राज्यातील अनेक मंत्र्यांना आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, अस्लम शेख यांनाही करोनाची बाधा झाली होती. या सर्वांनी करोनावर मात केली.

Advertisements

Check Also

वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील सुरगांव येथे धुलिवंदन साजरा करण्याचा एक आगळा-वेगळा सोहळा साजरा केला गेला.

वर्धा : येथील नागरिकांनी रंगांची उधळण न करता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांची उधळण करण्याचा …

*जिल्ह्यातील शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवा:आ.समीर कुणावार :आंदोलनात शेकडो शेतकरी सरपंचांचा सहभाग*

सम चौघीवार बैठक कार्यालयाची साखळी उपसा सुरू आहे तुझे वीज कनेक्शन कापण्याचा सपाटा महारण लावला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *