Breaking News

गेल्या २४ तासात देशात ९५ हजार ७३५ नवे करोनाबाधित रुग्ण

Advertisements
Advertisements

भारतातील रुग्णसंख्या ४४ लाखांच्या वर

भारतातली करोनाबाधित रुग्णसंख्येने ४४ लाखांचा टप्पा पार केला आहे. गेल्या २४ तासात देशात ९५ हजार ७३५ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ११७२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यासोबत देशातील एकूण करोनाबाधित रुग्णसंख्या ४४ लाख ६५ हजार ८६४ इतकी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. यामध्ये ९ लाख १९ हजार १८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून ३४ लाख ७१ हजार ७८४ जणांना उपचारानंतर घरी सोडवण्यात आलं आहे. दरम्यान करोनामुळे आतापर्यंत ७५ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे राज्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून बुधवारी २३ हजार ८१६ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १३ हजार ९०६ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून २४ तासांत ३२५ करोनाबाधितांचा मृत्यू झाला. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आालेल्या ४८ लाख ८३ हजार नमुन्यांपैकी ९ लाख ६७ हजार ३४९ (१९.८१ टक्के) जण करोनाबाधित असल्याचे आढळून आले आहेत, तर आतापर्यंत ६ लाख ८६ हजार ४६२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.९६ टक्यांवर पोहोचले आहे. राज्यात १६ लाख ११ हजार २८० व्यक्ती घरगुती अलगीकरणामध्ये, तर ३७,६४४ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात सर्वाधिक ६५ हजार ३६१ करोनाबाधित पुणे जिल्ह्य़ात आहेत.

Advertisements

Check Also

डॉ. धनंजय दातार  यांचा करोनाबाधित रुग्णांसाठी  नाविन्यपूर्ण उपक्रम

डॉ. धनंजय दातार  यांचा करोनाबाधित रुग्णांसाठी  नाविन्यपूर्ण उपक्रम चंद्रपूर (प्रतिनिधी) डॉ. धनंजय दातार यांच्या सहकार्यातून …

मेक्सिकोची अँड्रिया मेझा विश्वसुंदरी

गेल्यावर्षी ही स्पर्धा २०२१ पर्यंत लांबणीवर टाकण्यात आली होती. मिस इंडिया कॅस्टेलिनो चौथ्या क्रमांकावर फ्लोरिडा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *