Breaking News

वर्धा लोकसभा मतदार संघातील समस्या व लोकोपयोगी विषय प्रभावीपणे लोकसभेत मांडणार – खासदार रामदास तडस

Advertisements
Advertisements

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सहभागी होण्याकरिता खासदार रामदास तडस दिल्लीत दाखल

वर्धा : सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी :- कोविड-च्या पाश्र्वभूमीवर उपाययोजना करुन उद्यापासून संसदेच्या अधिवेशनाला प्रारंभ होणार असुन या आगामी अधिवेशनात वर्धा लोकसभा मतदार संघातील प्रमुख विषय मार्गी लावण्याकरिता संसदीय पध्दतीने माझे प्रयत्न असतील त्या करिता 14 सप्टेंबर ते 01 आॅक्टोबंर एकही सुट्टीचा दिवस न घेता हे अधिवेशन चालनार असुन जास्तीत जास्त न्याय मतदार संघाला मिळवून देण्याकरिता माझे प्रयत्न असतील असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.

आगामी संसद अधिवेशनात फार मोठे बदलाव झाले असुन लोकसभेची कार्यवाही दुपारी 3 ते 7 दरम्यान चालणार आहे त्याचप्रमाणे अतारांकित प्रश्न, शुन्य प्रहर, नियम 377 तसेच सरकारच्या माध्यमातुन अनेक महत्वाचे विधेयके चर्चेसाठी येणार आहे. अधिवेशन दरम्यान एकही सुट्टी नसल्याने तसेच कोविड-19 दिशानिर्देषानुसार संपुर्ण अधिवेशन काळात नवि दिल्ली येथे राहणे सर्व खासदारांना बंधनकारक असुन आपल्या मतदार संघातील जास्तीत जास्त विषय मांडण्यासाठी तसेच आपल्या भागातील समस्या संबधीत केन्द्रीय मंत्री यांच्यापंर्यत पोहचून समस्यावर तोडगा निघेल अशी अपेक्षा खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केली.

सर्वांच्या शुभेच्छा आशिवार्दामुळे माझी कोरोना चाचणी नकारात्मक आल्यामुळे व संपुर्ण सत्रात सहभागी होता येणार आहे. माझी सर्वांना विनंती आहे की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता मास्क, सॅनिटाईझर सोशल डिस्टसिंग या तिनही गोष्टीचा सर्व नागरिकांनी प्रभावी पणे वापर करावा व आपली काळजी घ्यावी असे आवाहन खासदार रामदास तडस यांनी केले.

Advertisements

Check Also

घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात आरोपीकडून एकूण ४,१०,७००/- रु चे मुद्देमाल जप्त …

*प्रहार जनशक्ती पक्ष ची सालोड हिरापूर येथे आज मोठ्या ताकतीने शाखा स्थापन*  रक्तदान करून शाखेचे उद्घाटन

    *मा.ना राज्यमंत्री श्री. बच्चू भाऊ कडू* यांचे विचार व कार्य गावा गावात घरा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *