Breaking News

महाराष्ट्राची लालपरी आज दि.18 पासून पूर्ण क्षमतेने धावणार : मात्र कोरोनासंदर्भातील नियम बंधनकारक राहतील

Advertisements
Advertisements

वर्धा प्रतिनिधी :-  मिळालेल्या वृत्तानुसार कोरोनामुळे संकटात सापडलेली महाराष्ट्राची लालपरी अर्थात एसटी बस उद्यापासून पूर्ण आसन क्षमतेने धावणार आहे उद्यापासून म्हणजे 18 सप्टेंबर पासून राज्यभरात पूर्ण आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ ला राज्य शासनाकडून मिळाली असून मात्र प्रवाशाना कोविड नियम पाळून प्रवास करावा लागेल प्रत्येक प्रवाशाना प्रवासादरम्यान मॉस्क व सॅनिटाईजरचा वापर करणे बंधनकारक असणार आहे मात्र एसटीच्या या निर्णयामुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो अशी भीतीही व्यक्त करण्यात येत असली तरी मिशन बिगेन अंतर्गत सेवा सुरू करण्यात येत आहे यापूर्वी 20 ऑगस्ट 2020 पासून  सोशल डिस्टनसिंग चे पालन करून राज्यभरात 50% आसन क्षमतेसह आंतरजिल्हा एसटी वाहतूक सुरू करण्यात आली होती आधीच तोट्यात असलेल्या एसटीला कोरोना दरम्यान प्रवासी मिळणे कठीण झाले होते मात्र एसटी महामंडळ कडून टप्प्या टप्प्याने वाहतूक सुरू करण्यात येत आहे कर्नाटक व गुजरात राज्यात 100% आसन क्षमतेसह  वाहतूक करण्यास परवानगी मिळाल्यानंतर आता महाराष्ट्रातही  लालपरी ला उद्यापासून म्हणजे 18 सप्टेंबरपासून  पूर्ण आसनक्षमतेने वाहतूक करण्यास राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली आहे मात्र बसेसमधून प्रवास करतांना प्रवाशानी मॉस्क व सॅनिटाईजर वापरणे बंधनकारक असणार आहे तसेच वाहतूक करण्यास वापरण्यात येणाऱ्या बसेस निर्जंतुक करण्यात याव्यात महत्वाचं म्हणजे उद्यापासून लालपरी सर्वसामान्य प्रवाशासाठी धावणार आहे.

Advertisements

Check Also

इरई नदीवरील स्टेड- ब्रिजला ‘रामसेतू’ नामकरणाचा ठराव

इरई नदीवरील स्टेड- ब्रिजला ‘रामसेतू’ नामकरणाचा ठराव चंद्रपूर, ता. २३ : इरई नदीवर पुलाचे बांधकाम पूर्ण झाले …

CBSE, ICSE 12th Exams : परीक्षा रद्दच, सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब!

CBSE, ICSE 12th Exams : परीक्षा रद्दच, सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब! देशात निर्माण झालेल्या करोनाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *