Breaking News

खेळाडूंनी प्रगती करीत असतांना सेवाभाव जपणे गरजेचे खासदार रामदास तडस

Advertisements
Advertisements

भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री श्री. नरेन्द्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमीत्य भारतीय जनता पार्टीच्या वतीने ‘‘सेवा सप्ताह’निमीत्य वर्धा जिल्हयातील राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळांडूचा गौरव समारंभ

वर्धा: भारताचे लोकप्रीय प्रधानमंत्री श्री. नरेन्द्रजी मोदी नरेंद्र मोदी हे एक ‘लोकनेते’ आहेत. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा आणण्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या नुसार प्रत्येक घटकाकरिता उपक्रम व योजना राबवीत आहे व प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचतील याची खबरदारी घेत आहे त्यामुळे आज आपला देश प्रगतीपथावर आहे, अश्या नेतृत्वाखाली मला काम करण्याची संधी मिळाली याचे मी भाग्य समजतो असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी यावेळी केले.,

आज सार्वजनिक बजरंग व्यायामशाळा, नालवाडी येथे भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री श्री. नरेन्द्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमीत्य भारतीय जनता पार्टीच्या वतीने ‘‘सेवा सप्ताह’’ निमीत्य वर्धा जिल्हयातील राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळांडूचा गौरव समारंभ खासदार रामदास तडस यांच्या शुभहस्ते संपन्न झाला, यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष डॅा. शिरीष गोडे, महासचिव मिंलीद भेंडे, उपविदर्भ केसरी मदनसिंग चावरे, भाजपा तालुका अध्यक्ष गिरीष कांबळे, भाजपा महिला अध्यक्ष शारदा तडस, ग्रामपंचायत सदस्य सुनिता तडस, महिला महामंत्री चेतना कांबळे उपस्थित होते.

खासदार तडस पुढे म्हणाले की, उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन केलेले खेळाडू जागतिक स्पर्धेत सहभागी होऊ शकतात व देशाचे तसेच जिल्हयाचे नावलौकीक करतात. त्याकरिता खेळांडूनी सदैव सराव करीत कठोर मेहनत घेणे आवश्यक आहे, आपण सर्वांनी कठोर मेहनत घेतली म्हणून राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या जिल्हयाचे नाव मोठे केले. यशस्वी होण्याकरिता देशप्रेम, खेळाडूभावना ही प्रत्येक खेळांडूच्या अंगी असणे अतिशय आवश्यक आहे तसेच खेळाडूंनी प्रगती करीत असतांना सेवाभाव जपणे गरजेचे असल्याचेही यावेळी खा. तडस म्हणाले.

      यावेळी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळामध्ये वर्धा जिल्हयातील खेळाडूंचा सत्कार करण्यात आले यामध्ये गिरीष उपाध्याय  (स्वीमींग), शामराव लोणकर ( धावपटू), नलिनीताई भोंगाडे (हॅंडबाॅल), मधुकर बोरुटकर (योगा) या  जेष्ट खेळाडूसह जिल्हयातील कुस्ती, थ्रोबाॅल, शुटींग, बाॅडी बिल्डींग, योगा, अॅथेलेटीक, धावपटु, साॅफ्टबाॅल, बेसबाॅल, धनुर्विद्या, स्काॅश, व्हाॅलीबाॅल, स्विमींग, सेपक टकरा, बॅटमिंटन, रग्बी, फुटबाॅल या खेळामध्य राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्हयाचे नाव करणा-या खेळांडूचा गौरव प्रमाणपत्र व बॅग देवून सत्कार करण्यात आला.

      यावेळी भाजपाचे अध्यक्ष डॅा. शिरीष गोडे, मिलींद भेंड यांनी समोयोचित मार्गदर्शन केले.

      कार्यक्रमाचे प्रास्तावीक सुनिता तडस यांनी केले संचालन हेमा शिंदे यांनी केले तर उपस्थितांचे आभार चेतना कांबळे यांनी मानले, कार्यक्रमाला राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुणवंत खेळाडू उपस्थित होते.

Advertisements

Check Also

आधार कार्ड हरवला किंवा विसरला, मग लगेच असे करा डाऊनलोड

आधार कार्ड हरवला किंवा विसरला, मग लगेच असे करा डाऊनलोड मुंबई- आपल्या भारतात कोणत्याही शासकीय …

शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठीच बाजार समित्यांची निर्मिती – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठीच बाजार समित्यांची निर्मिती – पालकमंत्री विजय वडेट्टीवार Ø कोरपना येथील कृउबासच्या नवीन कार्यालयाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *