महाराष्ट्र राज्याला देशी गाय व म्हैस विकास व संरक्षणासाठी राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत रु. 6896.78 लक्ष प्राप्त

Advertisements
Advertisements

खासदार रामदास तडस यांच्या लोकसभा प्रश्नाला केन्द्रीय मत्स्यपालन, पशुपालन व डेअरी  राज्य मंत्री डाॅ. संजीव कुमार बलीयान यांचे उत्तर प्राप्त

  • खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत उपस्थित केला अतारांकित प्रश्न 1560

वर्धा/दिल्ली: महाराष्ट्रात शेतक-यांसाठी दुग्धव्यवसाय किंवा पशुपालन हा आता केवळ जोडधंदा उरला नसून तो शेतक-यांचा एक प्रमुख व्यवसाय बनला आहे. राज्यातील देशी प्रजाती गायी-म्हशींची दूध उत्पादकता वाढवणे शेतक-यांच्या आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत महत्वाचे आणि गरजेचे झाले आहे. दूध उत्पादनाचा खर्च दिवसेंदिवस वाढत असल्याने दुग्धव्यवसाय किंवा पशुपालन व्यवसायात अडचणी येत आहेत. देशी प्रजाती यांच्या विकास आणि संरक्षणसाठी केन्द्र सरकार कोणत्या योजना तयार केल्या व आतापंर्यत किती निधी मंजूर केला या अनुषंगाने खासदार रामदास तडस यांनी अतारांकित प्रश्न संख्या 1560 अंतर्गत प्रश्न उपस्थित करून लोकसभेचे लक्ष वेधले.

        खासदार रामदास तडस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर केन्द्रीय मत्स्यपालन, पशुपालन व डेअरी  राज्य मंत्री डाॅ. संजीव कुमार बलीयान यांचे उत्तर प्राप्त यांचे लेखी उत्तर प्राप्त झाले असून या नुसार गोपशुच्या देशी प्रजातींना संरक्षण व संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या प्रयत्नांना पुर्ण करण्यासाठी पशुपालन आणि डेअरी विभाग अंतर्गत देशी प्रजाती च्या विकास व संरक्षणासाठी केन्द्र सरकारव्दारा राष्ट्रीय गोकुल मिशन योजना तयार करण्यात आलेली आहे, यामध्ये फक्त देशी प्रजाती यांच्या विकास आणि संरक्षण संबधीत आहे, केन्द्रीय क्षेत्र योजना अंतर्गत प्रजाती सुधार करण्यासाठी सात केंद्रीय गोपशू प्रचनन फार्म, चार केन्द्रीय पंजीकरण इकाईया आणि केन्द्रीय हिमित वीर्य उत्पादन आणि प्रशिक्षण संस्थेचा समावेश आहे. या संस्थेअंतर्गत विकास व संरक्षण करण्यासाठी गोपशु 1) थारपकर 2) लाल सिंधी 3) गिर 4) कंकरेज 5) औगोल 6) हरियाना व म्हसी 7) राठी प्रजातीचे भैस 8) सुरती, 9) मुर्रा 10) मेहसाना 11) जाफराबादी प्रजातीचा समावेश आहे. राष्ट्रीय गोकुळ मिशन संपूर्ण देशभरात राबविण्यात आला असून डिसंेबर 2014 प्रकल्प सुरुवात झाल्यापासुन ते आजपंर्यत राज्य व केंद्रशासित प्रदेशांना रु. 1764.4 करोड रुपये देण्यात आलेले आहे. राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत महाराष्ट्र भाग घेत असून राष्ट्रीय गोकुळ अभियानाच्या विविध घटकांच्या अंमलबजावणीसाठी रु. 6896.6 लक्ष देण्यात आले असल्याचेही उत्तरातून स्पष्ट केले.

        आपला देश शेतीप्रधान आहे. या शेती व्य्ासायाला संलग्ने असा पशुपालन हा व्यवसाय फार पुरातन काळापासून केला जातो. समाजातील फार मोठा घटक या व्यवसायावर अवलंबून आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय गोकुळ मिशन या योजनेमुळे दुग्ध व्यवसायातील नव-नवीन तंत्रज्ञानामुळे या पारंपरिक व्यवसायाला अधुनिकेतची जोड मिळेल तसेच दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी जास्त दूध देणा-या देशातील गाय व म्हशीच्या प्रजातींचे सिमेन्सचा वापर करुन दूध उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र सरकार राष्ट्रीय गोकुल मिशन अंतर्गत कार्य करीत आहे. राज्याच्या शेतीला पूरक व्यनवसाय म्हाणून दुग्ध व्यवसायाची जोड दिल्यास शेतक-यांना वर्षभर खात्रीशीर व सातत्यपपूर्ण उत्पन्न मिळेल. तसेच राज्याच्या दूध उत्पादनात वाढ होऊन ग्रामीण भागात स्वयंरोजगार  देखील निर्माण होईल असा विश्वास खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केला.

Advertisements

Check Also

घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात आरोपीकडून एकूण ४,१०,७००/- रु चे मुद्देमाल जप्त …

*प्रहार जनशक्ती पक्ष ची सालोड हिरापूर येथे आज मोठ्या ताकतीने शाखा स्थापन*  रक्तदान करून शाखेचे उद्घाटन

    *मा.ना राज्यमंत्री श्री. बच्चू भाऊ कडू* यांचे विचार व कार्य गावा गावात घरा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *