भारतीय जनता पक्षात जेवढा नेता महत्त्वाचा तितकाच कार्यकर्ता महत्त्वपूर्ण, खासदार रामदास तडस

Advertisements
Advertisements

देवळी भारतीय जनता पार्टी ग्रामीणची कार्यकारीणी घोषीत.

 

देवळी: कोणत्याही पक्षाचा किंवा संस्थेचा कार्यकर्ता हा त्या पक्षाचा मुख्य आधारस्तंभ असतो, जर कार्यकर्ता नाही तर कोणताच पक्ष नाही. भारतीय जनता पक्षात जेवढा नेता महत्त्वाचा तितकाच कार्यकर्ता महत्त्वपूर्ण असतो. हा कार्यकर्ता पक्षाचा आधारस्तंभ असून, तो जर मजुबुत असेल तर आपणा प्रत्येक राजकीय क्षेत्रात विजय मिळवीता येतो. याच शक्तीच्या जोरावर आपण देशामध्ये परिवर्तन घडवून आणले आहे असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी यावेळी केले व  नवनियुक्त पदाधिका-यांना शुभेच्छा दिल्या.

देवळी येथे भारतीय जनता पार्टी ग्रामीणची कार्यकारणी घोषीत केली यावेळी खासदार रामदास तडस, उपाध्यक्ष वैशाली जयंत येरावार, भाजपा महामंत्री मिंलींद भेंडे, पुर्व विदर्भ संपर्क प्रमुख प्रशांत इंगळे तिगांवकर, भाजपा देवळी तालुका ग्रामीण चे अध्यक्ष दशरथ भुजाडे, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष वरुण पाठक, प.स.उपसभापती युवराज खडतकर, देवळी विधानसभा प्रमुख दिपक फुलकरी, जि.प.सदस्य मयुरी मसराम, जि.प.सदस्य सुनिता राऊत,प.स.सदस्य दुर्गा मडावी, माजी पं.स.सदस्य श्रीधर लाभे, राजू रोकडे, भाजपा शहर अध्यक्ष रवी कारोटकर, देवळी युवा मोर्चा शहर अध्यक्ष अंकित टेकाडे उपस्थित होते. यावेळी भाजपा किसान मोर्चा पुर्व विदर्भ संपर्क प्रमुख म्हणून प्रशांत इंगळे तिगांवकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे शाल व श्रीफळ देवून स्वागत करण्यात आले.

यावेळी भाजपा अध्यक्ष दशरथ भुजाडे यांनी भाजपा ग्रामीणची कार्यकारणी घोषीत केली यामध्ये भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष रवीन्द्र भाणारकर, भाजपा महिला आघाडी अध्यक्ष दुर्गाताई मडावी, ओबीसी आघाडी अध्यक्ष गजानन सावरकर, किसान आघाडी अध्यक्ष महेश भिसे, अनु.जाती मोर्चा अध्यक्ष नंदूजी भस्मे, भटक्या जाती अध्यक्ष प्रभाकर ढोक, वैद्यकीय आघाडी ज्ञानेश्वर पाल, व्यापारी आघाडी अशोक ढोके, सोशल मिडीया अमोल इंगोले इ. कार्यकारणी घोषीत करण्यात आली.

कार्यक्रमाचे संचालन अरविंद झाडे यांनी केले उपस्थितांचे आभार वैभव श्यामकुवर यांनी मानले, कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण व शहरचे कायकर्ते उपस्थित होते.

Advertisements

Check Also

घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात आरोपीकडून एकूण ४,१०,७००/- रु चे मुद्देमाल जप्त …

*प्रहार जनशक्ती पक्ष ची सालोड हिरापूर येथे आज मोठ्या ताकतीने शाखा स्थापन*  रक्तदान करून शाखेचे उद्घाटन

    *मा.ना राज्यमंत्री श्री. बच्चू भाऊ कडू* यांचे विचार व कार्य गावा गावात घरा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *