आरोग्य कर्मचारी घरोघरी भेट – माझे कुटुंब माझी मोहीम *नागरीकांंनी न घाबरत योग्य माहीती द्यावी -दिलीप उटाणे

Advertisements
Advertisements

वर्धा प्रतिनिधी :- प्राथमिक आरोग्य केंद्र गौळ उपकेंद्र हुसनापूर येथे  माझे कुटुंब  माझी जबाबदारी अंतर्गत आरोग्य कर्मचारी घरोघरी जावून कुटुंबातील सदस्या सोबत आतंरव्यक्ती संवाद करुन घरातील सदस्यांना सर्दी ताप खोकला  आहे काय?  *इन्फ्यारेड थरमा मिटर* व्दारे  ताप . व *पल्स आँक्सीमिटर* व्दारे   शरिरातील आँक्सिजन पातळी  तपासणी करण्यात येत आहे .जर एकाद्या व्यक्तीच्या रक्तातील आँक्सिजन ९५ % पेक्षा कमी असल्यास साभाव्य  बाधित  व्यक्तीचा शोध घेतला जातो .तरी नागरीकांनी न घाबरता न भिता  घरी आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य माहीती द्यावे असे आवाहन आरोग्य सेवाक दिलीप उटाणे यांनी केले . *हुसनापूर येथे  २५ सप्टेबर रोजी माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत* आरोग्य तपासणी करण्यात आली काही जोखमीच्या लोकांना संदर्भ देण्यात आली.

मोहीमेत योग्य माहिती देवून  आपले कुटुंब सुरक्षित  ठेवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार .जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओंबासे  प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रभाकर नाईक यांनी केले असून तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रविण धमाने यांच्या मार्गदर्शनात आरोग्य सहाय्यक दिपक मेशराम आरोग्य सेवक दिलीप उटाणे .माधव कातकडे  अंशकालीन स्त्री परिचर जिजा नेहारे यांनी हुसनापूर येथे आरोग्य तपासणी केली.  *समुदायीक सर्वेक्षणात गृहभेटी व्दारे रुग्ण व संपर्कातील व्यक्तीचा शोध*. *कोवीड प्रतिबंध आणि नियंत्रण बाबत समुदायात जागरुकता  निर्माण करणे* *वैयक्तिक सुरक्षाकशी करावी या बाबात आरोग्य शिक्षण देण्यात येत आहे.
Advertisements

Check Also

लाईव्ह संजीवनी ऑर्थोपेडीक रुग्णालयात मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

लाईव्ह संजीवनी ऑर्थोपेडीक रुग्णालयात मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन चंद्रपूर, दि. 7 जुलै …

लसीकरण मोहिमेत सर्वांनी सक्रियतेने सहभागी व्हावे-डॉ .मंगेश गुलवाडे ,आय. एम. ए. चंद्रपूर कडून लसीकरणासाठी जनजागृती

लसीकरण मोहिमेत सर्वांनी सक्रियतेने सहभागी व्हावे-डॉ .मंगेश गुलवाडे आय. एम. ए. चंद्रपूर कडून लसीकरणासाठी जनजागृती चंद्रपूर – …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *