Breaking News

नाभिक व्यावसाईकाची झालेली कृर हत्या संबधी न्याय मिळणे व नाभिक व्यावसाईकावर वाढत असलेल्या अपराधिक घटना प्रकरणी प्रशासणाने हस्तक्षेप करून नाभिक व्यावसाईकांना सुरक्षा देण्यात यावी

Advertisements
Advertisements
नाभिक व्यावसाईकावर होत असलेल्या हल्या प्रकरणी आणि सामाजिक अवहेलना प्रकरणी सुरक्षा दृष्टीने नाभिक समाजास ऍक्ट्रासिटी ऍक्ट लागु करावा
वर्धा प्रतिनिधी :- सलून ब्युटी पार्लर असोसिएशन महाराष्ट्र राज्य वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन  देण्यात आले. आमचे नाभिक समाज बांधव केस कर्तनालय व्यावसाय करीत असुन आमची जागो जागी सपुर्ण महाराष्ट्रात फुटपाथ ते एसी शोरूम सलुन दुकाने आहेत हा आमच्या नाभिक बांधवांचा वंशपरपरागत व जातीय नाभिक समाजाचा व्यवसाय आहे . सलुन व्यवसाय काम करत असताना अतिशय तिष्ण अशी कामे करण्यची साधने हातात घेऊन कामे करावे लागते आणि आमचा व्यावसाय मानवांच्या शरीरांशी संबधित असुन आम्हाला प्रत्येक स्तरावरील व्याक्ती मग ति सभ्य असो कि असभ्य आणि अपराधिक प्रवृतीची असो कि गुंड प्रत्येकांस सेवा देणे असा आमचा व्यावसाय आहे . आजच्या स्थितीत नाभिक सलुन व्यवसाईक अपराधिक लोकांपासुन त्रस्त आहे व नाभिक समाजातिल निरअपराध लोकांवर हल्ले होत असुन समाज अल्पसंख्याक असल्या कारणाने अपराधिक लोकांपासुन असुरक्षित आहे अशिच घटना शुक्रवार दिनांक २५ / ० ९ / २०२० रोजी श्री . सुदेश हंसराज थुले वय ( ५८ ) वर्षे रा . न्यु खलाशी लाईन कामठी यांची गांवगुडांनी निर्गम हत्या केली व या आधी पण अशा बऱ्याच घटना घडुन सुध्दा शासन आणि पोलीस प्रशासन नाभिक व्यावसाईकाकडे सुरक्षात्मक व सामाजिक न्यायाचे दुष्टीने दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे नाभिक सलुन दुकानदार समाज भयभित झाला आहे नाभिक सलुन व्यावसाईक हा स्वताला असुरक्षीत समजत असुन शासणाने लक्ष द्यावे तसेच झालेल्या हत्या प्रकरणी सलुन समाज बांधवांस न्याय प्रदान करून लवकरात लवकर आरोपिस शिक्षा व्हावी आणि त्याच्या पिडीत कुंटूबांस प्रशासनाणे आर्थिक मदत द्यावी व पिडीत कुंटूबांतील व्याक्तीच्या उदरनिर्वाचा प्रश्न सोडवावा . नाभिक व्यावसाईकावर होत असलेल्या हल्या प्रकरणी आणि सामाजिक अवहेलना प्रकरणी सुरक्षा दृष्टीने नाभिक समाजास ऍक्ट्रासिटी ऍक्ट लागु करावा . नाभिक समाजाने वेळोवेळी निवेदन देऊन सुध्दा प्रशासणाची उदासिनता बघुन आमच्या नाभिक समाजाकडे दुर्लक्ष होत आहे . अशावेळी आम्ही समाजबांधव सामाजिक न्यायाकरीता रसत्यावर उतरून लोकतात्रिंक हक्का करीता तिव्र आदोलन करू आमची शासण प्रशासनला नम्र विनंती आहे कि त्यानी लवकरात लवकर आमच्या समाजावर होत असलेल्या अपराधिक हल्याची आणि न्यायीक गतीविधीची त्वरीत दखल घ्यावी अशी विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे.
Advertisements

Check Also

घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात आरोपीकडून एकूण ४,१०,७००/- रु चे मुद्देमाल जप्त …

*प्रहार जनशक्ती पक्ष ची सालोड हिरापूर येथे आज मोठ्या ताकतीने शाखा स्थापन*  रक्तदान करून शाखेचे उद्घाटन

    *मा.ना राज्यमंत्री श्री. बच्चू भाऊ कडू* यांचे विचार व कार्य गावा गावात घरा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *