मुख्यमंत्र्याचे हस्ते होणार सेवाग्राम विकास आराखडयातील कामाचे ई लोकार्पण

Advertisements
Advertisements

2 ऑक्टोंबरला सकाळी 7 वाजता  पदयात्रेचे आयोजन

महात्मा गांधी यांची 151 जयंती सप्ताह  

      वर्धा : जिल्हा प्रतिनिधी : राष्ट्रपिता  महात्मा गांधी यांच्या 151 वी जयंतीच्या निमित्ताने सेवाग्राम विकास आराखडा अंतर्गत  झालेल्या कामाचे  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे  यांचे शुभ हस्ते आणि उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ई-लाकार्पण होणार आहे.

       यावेळी  राज्याचे पशुसंवर्धन , दुग्धव्यवसाय  विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुनिल केदार   अपर मुख्यसचिव  नियोजन  देबाशिष चक्रवर्ती,  विभागीय  आयुक्त  डॉ. संजीव कुमार, जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे,  खासदार  विकास महात्मे, खासदार रामदास तडस,  सर्वश्री आमदार  नागो गाणार, डॉ. रामदास आंबटकर,  रणजित कांबळे, दादाराव केचे,  समीर कुणावार,  डॉ. पंकज भोयर,  नगराध्यक्ष अतुल तराळे , सेवाग्रामचे सरपंच   सुजाता  ताकसांडे,  वरुडचे  वासुदेव देवढे व पवनारचे  शालीनी आदमने   यांची उपस्थिती असणार आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 151 व्या जयंतीच्या निमित्ताने 2 ते 8 ऑक्टोंबर या कालावधित जिल्हा प्रशासनाचे वतीने सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताह दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी सेवाग्राम विकास आराखडा अंतर्गत झालेल्या कामाचे  2 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता  कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्या नवीन सभागृहात लोकार्पण  होणार आहे. कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर  कार्यक्रमात मर्यादित मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी जिल्हा माहिती कार्यालय, डिजीआयपीआर, मुबंई आणि  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या  फेसबुक पेज वरुन होणा-या थेट प्रेक्षपणाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी केले आहे.

पालकमंत्री सुनिल केदार , जिल्हाधिकारी  विवेक भिमनवार  व  मयार्दित गणमान्य नागरिक याच्या उपस्थितीत 2 ऑक्टोंबर ला सकाळी 7 वाजता  वर्धा जिल्हा सर्वोदय मंडळाचे वतीने  गांधी पुतळा ते  सेवाग्राम आश्रम पर्यंत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांनतर सकाळी 10 वाजता जिल्हा न्यायालयासमोरील हॉकर प्लाझा येथील स्टॉलचे उद्घाटन   करण्यात येणार आहे.

सायंकाळी 6 वाजता  महात्मा गांधी विश्वविद्यालय येथे गांधी दिपोत्सव, 3 ऑक्टोंबरला  सकाळी 11 वाजता   कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्या सभागृहात    गांधी विचारधारेवर व्याख्यानमाला  आयोजित करण्यात आली आहे.  व्याख्यान मालेत  खासदार कुमार केतकर,   टी.आर.एन.प्रभू,    विजय दिवान,  डॉ. पुष्पिता अवस्थी,  महात्मा गांधी विश्व विद्यालयाचे कुलगुरु  रजनिश शुक्ल, डॉ. जव्हार मार्गदर्शन करणार आहे.  4 ऑक्टोंबरला   महिला बचत गटांच्या कार्याबाबत  जिल्हास्तरीय वेबिनार, 5 ऑक्टोंबरला  एमगीरीच्या सभागृहात  सकाळी  9 ते सायंकाळी 5.15 दरम्यान ग्रामीण अर्थव्यवस्था सशक्तीकरणाकरीता एमगीरी  व्दारा  विकसित  तंत्रज्ञानावर आधारीत  जनजागृती  कार्यक्रम व उद्याजकता कार्यक्रम.

6 ऑक्टोंबरला  सकाळी 11 वाजता कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्या सभागृहात   श्रमाची प्रतिष्ठा कार्यक्रम,  7 ऑक्टोंबरला सकाळी 11 वाजता  संपूर्ण जिल्हाभर स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.  8 ऑक्टोंबरला विश्व हिंदी विद्यापिठ येथे   सकाळी 11 वाजता आंतरराष्ट्रीय वेबिनार, मंगल  प्रभात पुस्तकाचा संस्कृत अनुवाद तथा राष्ट्रपिता  महात्मा गांधीजी व आचार्य  विनोबा भावे यांचेवर आधारीत  पुस्तकाचे विमोचन होणार आहे.

कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्या वतीने निवडक गावांमध्ये  आरोग्य विषयक कार्यक्रम. एमगिरीच्या रेडिओ केंद्रावरुन  महात्मा गांधी यांच्या जीवनातील  महत्वाची  तत्वे  या विषयावर सकाळी  15 मिनिटे व सायंकाळी 15 मिनिटे कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Advertisements

Check Also

How to Purchase Term Papers That Are Right For Your Organization

A lot of folks go on the internet to buy term papers and then they …

Write My Essay For Me – How to Find the Best Online Essay Writing Service

If you’re in search of an online service to help me write my essay it …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *