वर्धा: कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात 84 कोरोनाबाधित, 96 कोरोनामुक्त तर 6 मृत्यू

Advertisements
Advertisements
वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- रविवार दि.4 : आज 473 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 84 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 49 पुरुष तर 35 महिलांंचा समावेश आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा 6 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे .
आज मृत्यू झालेल्यांंमध्ये सेलू- पुरुष 45, देवळी- महिला 60, 48, वर्धा – महिला  46, 80, समुद्रपूर -पुरुष 51) यांचा समावेश असून जिल्ह्यात एकूण मृत्यू संख्या 140 झाली असून यामध्ये कोरोनामुळे मृत्यू -139 तर इतर आजारामुळे मृत्यू- 1 चा मृत्यू झाला आहे.तर आज 96 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे.
जिल्ह्यात आज  84 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झालेल्यामध्ये
 
1)वर्धा 60 (पुरुष 32 महिला 28)
 
2)देवळी 3 (पुरुष 3)
 
3) सेलू 6 (पुरुष 5 महिला 1)
 
4) आर्वी 1(महिला 1)
 
5) आष्टी 6(पुरुष 4 महिला 2)
 
6)हिंगणघाट 5 (पुरुष 4 महिला 1)
 
7)समुद्रपूर 3 (पुरुष 1 महिला 2) रुग्णांंचा समावेश आहे
 जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी  पाठववलेले स्त्राव नमुने  37902 असून यामध्ये 37877 अहवाल प्राप्त झाले आहे. तर एकूण 32497 अहवाल निगेटिव्ह आले आहे.तर यामध्ये 25 अहवाल प्रलंबित आहे.जिल्ह्यातील एकूण कोरोना   बाधित रुग्णांंची संख्या 4936 झाली असून यामध्ये एकूण 2723 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे.
 आज जिल्ह्यात एकूण 2073  ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 77095 व्यक्ती गृह विलगिकरण करण्यात आले आहे.तर यामधून आज 1421 व्यक्ती गृहवीलगिकरणात आहे.
कोरोना चाचणी नेगेटिव्ह असल्यामुळे आज 456 व्यक्तींना रुग्णालयातून सुटी मिळालेली आहे.आज आयसोलेशन मध्ये असलेले  एकूण  1417 व्यक्ती आहे. जिल्ह्यात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोनाबाधित रुग्ण संख्या व मृत्यू संख्या पाहता नागरिकांनी जास्त खबरदारी घेणे गरजेचे आहे.त्याच सोबत शासन नियमांचे पालन करणे सुद्धा गरजेचे आहे.
Advertisements

Check Also

कोरोनामुळे मृत्यु झालेल्या व्यक्तिच्या कुटुंबाचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन

कोरोनामुळे मृत्यु झालेल्या व्यक्तिच्या कुटुंबाचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन Ø आपापल्या कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन Ø गरजूंना आर्थिक मदत …

विदेशात जाणाऱ्या नागरिकांसाठी 23 जून रोजी विशेष लसीकरण शिबिराचे आयोजन

विदेशात जाणाऱ्या नागरिकांसाठी 23 जून रोजी विशेष लसीकरण शिबिराचे आयोजन चंद्रपूर,दि. 21 जून : विदेशात जाणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *