Breaking News

अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची नुकसानांची सर्वेक्षण करुन शेतक-यांना तात्काळ आर्थीक मदत देण्यात यावी. खासदार रामदास तडस

Advertisements
Advertisements

वर्धा: वर्धा व अमरावती जिल्हयात सोयाबीनवर आलेल्या रोगामुळे शेतकरी वर्गाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे. महाराष्ट्र शासनाने कुठल्याही प्रकारची मदत जाहीर न केल्याने शेतकरी पुर्णपणे उध्वस्त होण्याच्या स्थितीत आहे. वर्धा व अमरावती जिल्हयात सोयाबीनवर आलेल्या प्रादुर्भावामुळे तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची तातडीने सर्वेक्षण करुन शासनाने शेतक-यांना दिलासा द्यावा अशी मागणी खासदार रामदासजी तडस यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली, या सोबतच पिकविम्याची रक्कम मिळण्याकरिता जिल्हाधिकारी वर्धा व अमरावती यांनी कालबध्द वेळेत कार्यवाही करावी अश्या सुचना यावेळी दिल्या.

आधि कोरोना, सोयाबीन पिकांवर रोग व आता अतीवृष्टी अश्या तिहेरी संकटात वर्घा व अमरावती जिल्हयातील शेतकरी सापडलेला आहे. . सोयाबीनवर अज्ञात रोग आल्याने शेतकर-यांच्या हातची पिकं गेली असून त्यांना मोठं नुकसान सोसावं लागलं आहे. तसेच आता अतिवृष्टीमुळे संपुर्ण सोयाबीनचे नुकसान झाले आहे, वर्धा जिल्हयातील सर्व तालुक्यातील सोयाबीन उत्पादन शेतक-यांच्या शेतात जावून सर्वेक्षण करुन मदतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, तसेच प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या लाभ मिळण्याकरिता सर्व शेतक-यांना सहकार्य करावे असे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले.

Advertisements

Check Also

घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात आरोपीकडून एकूण ४,१०,७००/- रु चे मुद्देमाल जप्त …

*प्रहार जनशक्ती पक्ष ची सालोड हिरापूर येथे आज मोठ्या ताकतीने शाखा स्थापन*  रक्तदान करून शाखेचे उद्घाटन

    *मा.ना राज्यमंत्री श्री. बच्चू भाऊ कडू* यांचे विचार व कार्य गावा गावात घरा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *