Breaking News

वर्धा : जिल्हा परिषद सदस्य उमेशभाऊ जिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य वृक्षारोपण तसेच त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल सत्कार

Advertisements
Advertisements
वर्धा जिल्हा प्रतिनिधी :-  वैशाली बुध्द विहार ट्रस्ट व धम्म मैत्री महिला मंडळ समता नगर सावंगी मेघे च्या वतीने जि.प.सदस्य उमेशभाऊ जिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वैशाली बुध्द विहारात बुध्द वंदना घेवून केक कापून शाल व गुच्छ देवून सत्कार करण्यात आला . त्यांच्यावाढदिवसानिमित्त बोधीवृक्ष पिंपळ व अशोकाचेझाडे लावण्यात आले . वृक्ष लागवडीसोबत वृक्षाचे संवर्धन व संगोपन झाले पाहिजे . असे विचार जि.प. सदस्य उमेशभाऊ जिंदे यांनी व्यक्त केले . कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वैशाली बुध्द विहार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सुमेधभाऊ डुकरे तर प्रमुख अतिथी म्हणून चॅरिटेबल ट्रस्टचे सल्लागार राजपालजी मेश्राम , गौतम भितरे , अरुण भोवते , तसेच ग्राम पं . सदय सुरेश वैद्य हे उपस्थित होते . कार्यक्रमाचे संचालन देवराव इंगोले यांनी केले तर आभार प्रदर्शन उमाताई इंगोले यांनी व्यक्त केले . कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य सुभाष सुटे , प्रशांत गजभिये , गौतम गणवीर , नितिन जाधव , आशिष थुल , राजेश घुसे , संदिप दलाल , हेमंत बुचुडे , विवेक सुटे , किशोर भगत , प्रशांत मेश्राम , हर्षल वैद्य , संदिप मेश्राम , विराज रामटेके , बंडू भितरे , मंगेश टेंभरे , धम्ममेत्री महिला मंडळाचे अध्यक्ष ज्योतीताई मेश्राम , तसेच सुनंदा खैरकार , उमाताई इंगोले , दिपीका घोडेस्वार , साधना कांबळे , महानंदा भोयर , सरोज टेंभरे , चंदा डुकरे , ज्योती भोंगाळे , आशा आव्हाड , उज्वला गायकवाड , शिला धाबर्डे , विद्या भगत , चंद्रकला सुटे , सुनंदा भोयर , मायाताई बुचुंडे , व शंभरकर ताई यांनी परिश्रम घेतले , वृक्षारोपण झाल्यावर अल्पोहार घेवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .
Advertisements

Check Also

घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात आरोपीकडून एकूण ४,१०,७००/- रु चे मुद्देमाल जप्त …

*प्रहार जनशक्ती पक्ष ची सालोड हिरापूर येथे आज मोठ्या ताकतीने शाखा स्थापन*  रक्तदान करून शाखेचे उद्घाटन

    *मा.ना राज्यमंत्री श्री. बच्चू भाऊ कडू* यांचे विचार व कार्य गावा गावात घरा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *