Breaking News

कर विभाग निरंतर सुरु

Advertisements
Advertisements

मालमत्ता कराचा भरणा करण्यास निरंतर सुरु मनपा कर विभाग

चंद्रपूर ४ मार्च –   मालमत्ता कराचा भरणा करण्यास सुविधता व्हावी यादृष्टीने चंद्रपूर महानगरपालिका कर विभाग सातत्याने सुरु राहणार आहे. केवळ धुलीवंदन ( दि. २९ मार्च ) ची सुटी वगळता इतर सुट्यांच्या दिवशीही कर विभाग सुरु राहणार आहे. कर विभागाचे कर्मचारी पूर्णवेळ कामावर हजर राहणार असुन नागरीकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेची मालमत्ता कर वसुली मोहिम मा. आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली उपायुक्त श्री. अशोक गराटे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सहायक आयुक्त यांच्या नेतृत्वात क्षेत्रीय अधिकारी भाऊराव सोनटक्के, नरेंद्र बोभाटे व कर विभाग प्रमुख श्री. सुरेश माळवे यांच्याद्वारे सातत्याने राबविली जात आहे.  जास्तीत जास्त मालमत्ता धारकांनी कराचा भरणा करावा या दुष्टीने मनपातर्फे शास्तीमधे सुटही देण्यात आली होती. करातुन येणारे उत्पन्न हे महानगरपालिकेच्या उत्पनाचे  मुख्य स्रोत असल्याने व त्यावर आर्थिक बाजू अवलंबित असल्याने कराची वसुली होणे आवश्यक असते. मनपातर्फे याबाबत वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत.

Advertisements

Check Also

दुपारी १ वाजता निकाल लागूनही विद्यार्थी आणि पालकांना आपला निकाल पाहता आलेला नाही.

बोर्डाचा गलथान कारभार; चार तासानंतरही विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईना दहावीच्या निकालाच्या दोन्ही वेबसाईट तब्बल ३ तासांहून …

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन ▪️   चंद्रपूर ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजिकल सोसायटीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *