Breaking News

महासमृध्दी महिला सक्षमीकरण अभियानाचा शुभारंभ

Advertisements
Advertisements
*महासमृध्दी महिला सक्षमीकरण अभियानाचा शुभारंभ*
 सिंदेवाही – तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष प. स. सिंदेवाही अंतर्गत पंचायत समिती सभागृहात  दिनांक 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या पर्वावर “महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानाचा” शुभारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती मंदाताई बाळबुद्धे, सभापती प. स.सिंदेवाही कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. शिलाताई कन्नाके  , उपसभापती प. स. सिंदेवाही , पंचायत समिती सदस्य सौ प्रीतीताई गुरनुले, सौ नलिनीताई चौधरी,श्री राहुल पोरेड्डीवार, श्री रणधीर दुपारे  पंचायत समिती सदस्य सर्व, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री घाटोळे साहेब  , सौ नीलिमा  कोवले भरारी प्रभाग संघ अध्यक्ष वासेरा यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विवेक नागरे तालुका अभियान व्यवस्थापक तर संचालन श्री ज्ञानेश्वर मल्लेवार प्रभाग समन्वयक व आभार प्रदर्शन कु सविता उईके प्रभाग समन्वयक यांनी केले.  सौ  प्रतिभा थेरकर, सुनीता चौधरी, भारती वाघमारे या महिलांनी मनोगत व्यक्त केले यात स्वतः करीत असलेल्या कामाविषयी माहिती दिली,  यावेळी 10 समूहांनी वेगवेगळे लोणचे, पापड, मसाले, वड्या, शेंगदाणे पापडी, लाडू, नैसर्गिक गुलाल, फिनाईल,पंचगव्य साबण, हळद पावडर, इत्यादीं साहित्याचे प्रदर्शनी स्टॉल लावण्यात आले होते.  कार्यक्रम यशस्वते करिता श्री उद्धव मडावी तालुका व्यवस्थापक श्री राहुल बोपचे तालुका व्यवस्थापक, श्री संदीप उईके प्रभाग समन्वयक, श्री मनोज दुपारे।  ऍडमिन अकाउंटंट,श्री प्रफुल मडावी, श्री सचिन लोंधे, श्री मयूर खोब्रागडे यांनी व  तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष सिंदेवाही  सर्व कर्मचारी व ICRP, CTC, प्रभाग संघ पदाधिकारी   ताई यांचे उपस्थितीत साजरा करण्यात आला.
Advertisements

Check Also

दुपारी १ वाजता निकाल लागूनही विद्यार्थी आणि पालकांना आपला निकाल पाहता आलेला नाही.

बोर्डाचा गलथान कारभार; चार तासानंतरही विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईना दहावीच्या निकालाच्या दोन्ही वेबसाईट तब्बल ३ तासांहून …

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन ▪️   चंद्रपूर ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजिकल सोसायटीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *