Advertisements
Advertisements
बगीच्याचा कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्ट्राचार
काँग्रेस तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे निवेदन 

घुग्घुस : नगरपरिषद मधील प्रधानमंत्री खनिज क्षेत्र योजने अंतर्गत वर्ष 2017 ते 2020 याकाळात विविध वॉर्डात ऐकून दहा बाल उद्यान निर्माण करण्यात आलेले आहे.
या उद्यानाला प्रत्येकी अंदाजे जवळपास पंचयातर लाख ते एक कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहे.
या कामात वाजवीपेक्षा जास्त शासकीय निधी खर्च करण्यात आला असून याकामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्ट्राचार झाला असून याकामाची सखोल चौकशी करून संबंधीत ठेकेदार, अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी घुग्घुस शहर काँग्रेस पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांची भेट घेवून निवेदन दिले याप्रकरणातील परिपूर्ण माहिती देऊन या भ्रष्ट्राचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली याप्रसंगी घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी, किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर उपस्थित होते.
Advertisements