Breaking News

कोरपना तालुक्यातील “कुसळ शरीफ़” येथे यंदा उर्स उत्सव नाही. (कोरोनाचे सावट,कमिटीचा निर्णय.)

Advertisements
Advertisements
कोरपना(ता.प्र.):-
      कोरपना तालुक्यातील आदिवासी बहूल गाव “कुसळ शरीफ़” येथे मागील कित्येक वर्षांपासून “हज़रत दुल्हाशहा वली बाबा” यांचा तीन दिवसीय उर्स उत्सव(संदल)मोठ्या थाटामाटात व हर्षोल्हासाने साजरा केला जातो.दरवर्षी हजारोंच्या संख्येने सर्वधर्मीय भक्त-भाविकांची गर्दी याठिकाणी पहायला मिळते.पुरातन काळापासून निसर्गरम्य ठिकाणी बाबांची समाधी(मजा़र)अस्तित्वात असून दरवर्षी येथे पारंपारिक पद्धतीने उर्स उत्सव व धार्मीक कार्यक्रम पार पडतात.मात्र यंदा कोरोना संकटामुळे उर्स उत्सव रद्द करण्यात आला आहे.
       एकतेचा प्रतिक मानल्या जाणार्‍या या तिर्थ स्थळावर चंद्रपूर जिल्ह्यासह नागपूर,वर्धा, यवतमाळ,नांदेड व तेलंगणा राज्यातून मोठ्यासंख्यने सर्वधर्मीय भावीक मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात.तीन दिवसांच्या या कालावधीत मिलाद(भजन),संदल,कव्वाली तसेच कौमी एकतेचे कार्यक्रम आयोजित केले जातात.यंदा मात्र हजारो भावीक-भक्त यासर्वांना मुकणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गर्दी टाळण्याच्या दृष्टीने “आपले आरोग्य, आपली सुरक्षा” लक्षात घेत यंदा वार्षीक उत्सव रद्द करण्याचा निर्णय कमिटीने घेतला असून यात्रेत कोणतेही दुकाने अथवा इतर कार्यक्रम होणार नाही,जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या निर्देशानुसार धार्मिक विधीने कार्यक्रम पार पाडणार,कोणतेही रॅलीचे आयोजन केले जाणार नसून २५ मार्च पर्चम कुशाई व रात्री मिलाद शरीफ़,२६ मार्च संदल चादर चढ़ाई आणि २७ मार्च रोजी सकाळी कुल फा़तीहा अशाप्रकारे विधीवत कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष सैय्यद आबीद अली यांनी ” दै.चंद्रधून ” ला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.
Advertisements

Check Also

दुपारी १ वाजता निकाल लागूनही विद्यार्थी आणि पालकांना आपला निकाल पाहता आलेला नाही.

बोर्डाचा गलथान कारभार; चार तासानंतरही विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईना दहावीच्या निकालाच्या दोन्ही वेबसाईट तब्बल ३ तासांहून …

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन ▪️   चंद्रपूर ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजिकल सोसायटीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *