Breaking News

राजूरा विधानसभेत धोटे विरूद्ध धोटे.

Advertisements
Advertisements
राजूरा विधानसभेत धोटे विरूद्ध धोटे.
(१०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय लोकार्पण)
कोरपना (ता.प्र.):-
       राजूरा येथील ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या श्रेणीवर्धित उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. या रुग्णालयासाठी अद्ययावत इमारत बाधकामास ०२ सप्टेंबर २०१४ ला मान्यता मिळाली.मात्र निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यामुळे आणि  निवडणूकांनंतर राज्यात सत्ता परिवर्तन झाले. तत्कालीन आमदार अ‍ॅड.संजय धोटे यांनी झालेल्या कार्यवाहीचा आढावा घेऊन तत्कालीन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून जून २०१८ मध्ये १४.१७ कोटी रुपयांची इमारत कामाची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळविली.जुलै २०१५ च्या पुरवणी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली. वारंवार कामाच्या प्रगतीचा आढावा घेऊन तत्कालीन आमदार अ‍ॅड.संजय धोटे यांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करू त्यांनी आपल्या कार्यकाळात सन २०१९ पर्यंत काम पूर्ण करून घेतले.परंतु रुग्णालयात आवश्यक अद्ययावत उपकरणे खरेदी आणि वाढीव पडनिर्मिती साठी आरोग्य संचालनायलात विलंब झाल्याने त्यावेळी इमारतीचे लोकार्पण होऊ शकले नव्हते.सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रुग्णालय इमारत तेव्हाच आरोग्य विभागाला हस्तांतरित करण्यात आली होती.
    परंतू तयार विकासकामांचे श्रेय लायटण्याचे काम विद्यमान लोकप्रतिनिधी कडून होत आहे. आपली विकासकामाबद्दल असलेली अकार्यक्षमता व अर्थसंकल्पातील राजूरा विधानसभा क्षेत्रातील विकासासाठी असलेल्या अल्प तरतुदी लपविण्यासाठी(१३मार्च) रोजी रुग्णालय इमारत लोकार्पण कार्यक्रम घेतला आहे.प्रशासनाकडून कोविड-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यक्रमावर निर्बंध लावले जात असताना शासनाच्या नियमाला बाजूला सारून हा कार्यक्रम घेण्यात आला आहे.ही बाब अत्यंत निंदनीय असल्याचा आरोप राजूरा विधानसभेचे माजी आमदार अ‍ॅड.संजय धोटे यांनी केला आहे.
Advertisements

Check Also

दुपारी १ वाजता निकाल लागूनही विद्यार्थी आणि पालकांना आपला निकाल पाहता आलेला नाही.

बोर्डाचा गलथान कारभार; चार तासानंतरही विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईना दहावीच्या निकालाच्या दोन्ही वेबसाईट तब्बल ३ तासांहून …

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन ▪️   चंद्रपूर ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजिकल सोसायटीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *