Breaking News

माणिकगडच्या डस्ट संदर्भात नगरसेवक डोहे यांचा पाठपुरावा उल्लेखनीय,  प्रादेशिक अधिकारी “करे” यांचे शिष्टमंडळाला समाधानकारक आश्वासन.

Advertisements
Advertisements
माणिकगडच्या डस्ट संदर्भात नगरसेवक डोहे यांचा पाठपुरावा उल्लेखनीय.  
(प्रादेशिक अधिकारी “करे” यांचे शिष्टमंडळाला समाधानकारक आश्वासन.
कोरपना ता.प्र.:-
     कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरात विराजमान आंतरराष्ट्रीय दर्जाची “माणिकगड सिमेंट कंपनी” च्या डस्टमुळे शहरवासी पुरते हैराण झाले आहे.डस्ट प्रदूषणामुळे नागरिकांचा जीव अक्षरशः धोक्यात आला आहे.डस्टच्या उपाययोजनेसाठी जिल्हा प्रदुषण नियंत्रण मंडळासह संबंधितांकडे वारंवार तक्रारी केल्या.मात्र या बलाढ्य कंपनीपुढे सगळेच हतबल असल्याने कारवाई शून्य असल्याचे आरोप होत आहे.शासनाचे लक्ष वेधण्यासाठी साईशांती नगरवासीयांनी चार दिवसापुर्वी कंपनीच्या विरोधात मोर्चापण काढला होता.डस्टवर नियंत्रण आणावे यासाठी मागील दिड महिन्यापासून सतत निवेदने दिली जात आहे,तरीपण या जीवघेण्या समस्याचे समाधान होताना दिसत नसल्याचे लक्षात घेऊन भाजपचे नगरसेवक अरविंद डोहे यांनी २४ मार्च रोजी एका शिष्टमंडळाद्वारे चंद्रपूर येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक अधिकारी “अ.मा.करे” यांची प्रत्यक्ष भेट घेऊन दिलेल्या निवेदनावर आपण कोणती कारवाई केली याबद्दल चर्चेद्वारे सखोल माहिती घेतली.
       “एक,दीड महिन्यापूर्वी माणिकगड सिमेंट कंपनीची कम्पलेंट आली होती,त्या अनुषंगाने आम्ही शोकास नोटीस काढलेली आहे आणि आता जे नगरसेवक डोहे यांनी आंदोलनाच्या अनुशंगाने लेटर दिलेले आहे त्यावर शोकास नोटीस नंतर आता प्रोपुट डायरेक्शन आम्ही देणार आहे.आणि तीचा सविस्तर रिपोर्ट हेड आँफीसला पाठवणार आहे.तीथे हेरिंग होईल आणि एक्शन होईल.स्टेज वाईज आम्ही चाललो आहो,प्रयत्न करतोय” अशी माहिती प्रादेशिक अधिकारी अ.मा.करे यांनी “दै.चंद्रधून” ला दिली आहे.यानंतर डस्ट प्रदूषणावर निमंत्रण आणले नाही तर गेल्यावेळी पेक्षा अधिक तीव्र असा आंदोलन उभारण्याचा इशारा डोहेसह साईशांती नगरवासीयांनी दिला आहे.माणिकगड सिमेंटच्या डस्टपासून नगरवासीयांना समाधान मिळावा यासाठी नगरसेवक अरविंद डोहे यांचे प्रयत्न व सतत पाठपुरावा उल्लेखनीय ठरत  असल्याची भावना व्यक्त होत आहे.
Advertisements

Check Also

दुपारी १ वाजता निकाल लागूनही विद्यार्थी आणि पालकांना आपला निकाल पाहता आलेला नाही.

बोर्डाचा गलथान कारभार; चार तासानंतरही विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईना दहावीच्या निकालाच्या दोन्ही वेबसाईट तब्बल ३ तासांहून …

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन ▪️   चंद्रपूर ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजिकल सोसायटीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *