Breaking News

खोब्रामेंढा चकमकीत नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले,पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान,43 लाख रुपये होते बक्षीस

Advertisements
Advertisements

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले ;

खोब्रामेंढा चकमकीत डीकेएसझेडसी सदस्य भास्कर व सुजातासह पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान

नक्षल्यांच्या रक्ताने सी – 60 जवानांनी खेळली होळी ;

शस्त्रास्त्रांसह मोठ्या प्रमाणावर नक्षल साहित्य जप्त

 * 43 लाख रुपये होते बक्षीस

 गडचिरोली पोलीसांच्या विशेष नक्षल विरोधी अभियान पथक सी -60 ने खोब्रामेंढा पहाडीवर काल  अभियानादरम्यान झालेल्या चकमकीत दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचे सदस्य जहाल नक्षली भास्कर व टिपागड एलओएस सुजातासह पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घालून होळीच्या पर्वावर लाल  यश संपादन केले आहे.

कुरखेडा अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र मालेवाडा हद्दीत नक्षलवादी मोठया प्रमाणात एकत्र आले असुन ते दरवर्षी नक्षल्यांकडून पाळल्या जात असलेल्या टिसोओसी नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर घातपात करण्याची शक्यता असल्याची गोपनिय माहिती  पोलीस अधीक्षक  अंकित गोयल यांना मिळाली. गोपनिय माहितीच्या आधारावर विशेष पोलीस ऊपमाहनिरीक्षक संदीप पाटील व पोलीस अधीक्षक  अंकित गोयल यांचे मार्गदर्शनात अपर पोलीस अधीक्षक (अभियान)  मनीष कलवानीया यांच्या नेतृत्वाखाली मौजा खोब्रामेंढा जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलातील सी-60 चे जवान नक्षलविरोधी अभियान असतांना  जंगलात दबा धरून बसलेल्या 40 ते 50 नक्षलवादयांनी सी-60 जवानांवर हल्ला चढविला. पोलीसांनी या हल्याला जोरदार   प्रत्युत्तर देत नक्षलवाद्यांना सळो की पळो करून सोडले. सुमारे दोन ते अडीच तास चाललेल्या या  चकमकीनंतर सदर जंगल परिसरात सी-60 जवानांनी शोध अभियान राबविले असतांना दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचे सदस्य जहाल नक्षली  टिपागड एलओएस  रुषी रावजी ऊर्फ पवन ऊर्फ भास्कर हिचामी, टिपागड एलओएस प्लाटून 15 सदस्य सुजाता ऊर्फ कमला ऊर्फ पुनीता गावडे ऊर्फ आत्राम वय 38, टिपागड एलओस उपकंमाडर राजु ऊर्फ सुखदेव बुधेसिंग नैताम वय 32, कसनसुर एलओएस पार्टी मेंबर अमर मुवा कुंजाम वय-30, कटेझरी टिपागड एलओएस पार्टी मेंबर अस्मीता ऊर्फ सुखलु पदा 28 या पाच जहाल नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलीसांच्या हाती लागले. या सर्वांवर 43 लाखांचे बक्षिस होते. या शिवाय आणखी 4 तेे 5 नक्षली जखमी झाले असण्याची चिन्ह घटनास्थळावर आढळून आली. अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नक्षलविरोधी अभियानाचे गडचिरोली परिक्षेत्राचे विशेष पोलीस ऊपमाहनिरीक्षक संदीप पाटील यांची विशेष ऊपस्थिती होती. या सर्वांवर अनेक गुन्हे दाखल आहेत. या चकमकीत पोलीसांना 4 मोठ्या रायफलींसह लैपटॉप, पेन ड्राइव्ह या सह मोठ्या प्रमाणावर नक्षल साहित्य सापडले आहे.

Advertisements

Check Also

दुपारी १ वाजता निकाल लागूनही विद्यार्थी आणि पालकांना आपला निकाल पाहता आलेला नाही.

बोर्डाचा गलथान कारभार; चार तासानंतरही विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईना दहावीच्या निकालाच्या दोन्ही वेबसाईट तब्बल ३ तासांहून …

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन ▪️   चंद्रपूर ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजिकल सोसायटीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *