Breaking News

पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द,पुढील वर्गात प्रवेश

Advertisements
Advertisements

पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द
मुंबई-
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी त्यांनी ही माहिती दिली आहे.

वर्षा गायकवाड म्हणाल्या, राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत आपल्याशी संवाद साधत असताना, इयत्ता पहिली ते आठवीचे वार्षिक मुल्यमापन संदर्भात मी बोलणार आहे. मधल्या काळात ऑनलाईन, ऑफलाईन यूट्यूब, तसेच गुगल आदींच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवले. या वर्षात आपण पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरू करू शकलेलो नाही. पाचवी ते आठवीच्या शाळा आपण सुरू केल्या, परंतु काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या, काही ठिकाणी सुरू होऊ शकल्या नाहीत. ज्या ठिकाणी शाळा सुरू झाल्या त्या ठिकाणी देखील त्यांचा अभ्यासक्रम त्या पूर्ण करू शकलेल्या नाहीत. परंतु आपण मुलाचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विविध माध्यमातून शिक्षण पोहचावण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करत होतो.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वार्षिक मुल्यमापनाबाबत निर्णय घेत असताना, शालेय शिक्षण माध्यमाद्वारे असा निर्णय घेत आहोत की, पहिली ते आठवीचे जे विद्यार्थी आहेत, आरटीईच्या अंतर्गत म्हणजे मोफत शिक्षण अधिकाराच्या कायद्यांतर्गत, आज आम्ही शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून असा निर्णय घेत आहोत की, राज्यातील जे पहिली ते आठवी इयत्तेमधील शिक्षण हक्क अधिकाऱाच्या अंतर्गत जे विद्यार्थी येतात, त्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करून पुढील इयत्तेत पाठवण्यात येत आहे.

Advertisements

Check Also

दुपारी १ वाजता निकाल लागूनही विद्यार्थी आणि पालकांना आपला निकाल पाहता आलेला नाही.

बोर्डाचा गलथान कारभार; चार तासानंतरही विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईना दहावीच्या निकालाच्या दोन्ही वेबसाईट तब्बल ३ तासांहून …

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन ▪️   चंद्रपूर ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजिकल सोसायटीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *