Breaking News

क्रीडांगणाचे काम तातळीने पूर्ण करा : क्रीडा मंत्री सुनील केदार यांना काँग्रेसचे निवेदन

Advertisements
Advertisements
क्रीडांगणाचे काम तातळीने पूर्ण करा : क्रीडा मंत्री सुनील केदार यांना काँग्रेसचे निवेदन
चंद्रपूर : जिल्ह्यात पशु संवर्धन, दुग्धव्यवसाय,क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांचे प्रथम आगमना निमित्त घुग्घुस काँग्रेस तर्फे अध्यक्ष राजुरेड्डी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले तसेच घुग्घुस नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या अमराई वॉर्ड क्रं.01 मधील प्रस्तावित नियोजित क्रीडांगणाचे बांधकाम तातळीने करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
येथील अमराई वॉर्डातील बहादे ले  – आऊट हे परिसरातील मुलां साठी युवकां साठी हे एकमेव खेळाचे मैदान असून मुलं येथे क्रिकेट, व्हॉलीबॉल, सायकल चालविणे व अन्य खेळाचे सराव करीत असतात.
यासोबतच पोलीस भर्तीचे सराव, वॉकिंग, रनिंग आदीसाठी ही हा मैदान महत्वपूर्ण ठरणार असल्याने कृपया या मैदानाचे सुसज्ज अश्या क्रीडांगणात तातळीने रूपांतर करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली
याप्रसंगी किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर, प्रफुल हिकरे, सचिन कोंडावार, संपत कोंकटी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
Advertisements

Check Also

दुपारी १ वाजता निकाल लागूनही विद्यार्थी आणि पालकांना आपला निकाल पाहता आलेला नाही.

बोर्डाचा गलथान कारभार; चार तासानंतरही विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईना दहावीच्या निकालाच्या दोन्ही वेबसाईट तब्बल ३ तासांहून …

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन ▪️   चंद्रपूर ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजिकल सोसायटीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *